शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नाफेडच्या ९ केंद्रांवर केवळ ६७ शेतकऱ्यांकडून नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 23:54 IST

खरीप हंगामातील पिके हाती आलेली असतानाच अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. कोंब फुटल्याने व काळवंडल्याने ही पिके नाफेडच्या निकषात पात्र ठरणार नसल्याची मानिसकता बनल्याने जिल्ह्यातील शेतक-यांनी माल विकण्यासाठी नोंदणीदेखील केली नाही.

ठळक मुद्देमुगासाठी ५५ , सोयाबीनसाठी १० शेतकऱ्यांची नोंदणी : दोन महिन्यांत अल्प नोंदणी; १५ डिसेंबरपर्यंत नोंदणीसाठी मिळाली मुदतवाढ

बीड : खरीप हंगामातील पिके हाती आलेली असतानाच अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. कोंब फुटल्याने व काळवंडल्याने ही पिके नाफेडच्या निकषात पात्र ठरणार नसल्याची मानिसकता बनल्याने जिल्ह्यातील शेतक-यांनी माल विकण्यासाठी नोंदणीदेखील केली नाही. दोन महिन्यात केवळ ६७ शेतक-यांनी नोंदणी केली आहे. यात ५६ शेतकºयांनी मूग विक्रीसाठी नोंदणी केली आहे. यावरु न सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट होत आहे. तर आहे तो माल विकण्याची चिंता शेतकºयांना आहे.शाासकीय हमीदराने खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून नाफेडच्या वतीने खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी केंद्र निश्चित करण्यात आले होते. जिल्ह्यातील ९ केंद्रांवर यासाठी १५ सप्टेंबरपासून नोंदणी सुरु केली होती. जून ते सप्टेंबर कालावधीत अनियमित पाऊस झाला तरी पिके जोमात होती. दरम्यान आॅक्टोबरमध्ये जिल्ह्यात सर्वच तालुक्यात अवेळी आणि मुसळधार पाऊस झाला. या पावसाने हाती आलेला घास हिरावला. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले. यात सोयाबीनचे नुकसान मोठ्या प्रमाणात आहे. पावसाच्या तडाख्यानंतर शेतीाकामात शेतकरी आहेत. भिजलेली, काळवंडलेली पिके असल्याने हा माल कोणी घेणार नाही अशी स्थिती आहे. त्यात ही पिके आता नाफेडचे निकष पूर्ण करु शकणार नाहीत. त्यामुळे शेतक-यांनी नोंदणीकडे पर्यायाने नाफेडला माल विकण्याकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील ९ केंद्रांवर दोन महिन्यात केवळ ६७ शेतकºयांनी नोंदणी केली आहे. सर्वत्र प्रतिसाद कमी मिळाल्याने तसेच शेतक-याच्या अडचणी लक्षात घेऊन नाफेडने खरेदीसाठी १५ डिसेंबरपर्यंत नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. परंतु खरीप हंगामातील उत्पादनाची एकूण परिस्थिती लक्षात घेता शेतकरी मोठ्या संख्येने नोंदणी करतील असे चित्र सध्यातरी नाही.मुगासाठी बीडमध्ये सर्वाधिक नोंदणीमूग विक्रीसाठी नाफेडच्या बीड केंद्रावर ४४ शेतक-यांनी नोंदणी केली आहे. अंबाजोगाई, माजलगाव, धारुर येथे प्रत्येकी एक तर परळीत ९ शेतक-यांनी नोंदणी केली आहे.चार तालुक्यातील नोंदणी निरंकसोयाबीनसाठी बीडमधून ८ तर माजलगावात २ अशा १० शेतक-यांनी नोंदणी केली आहे. तर केवळ परळीत उडीद विक्रीसाठी एका शेतक-याची नोंदणी आहे. गेवराई, शिरुर, आष्टी, पाटोदा येथे एकाही शेतक-याची नोंदणी झालेली नाही.सोयाबीनचा दर्जा खराबपावसामुळे सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात भिजले आहे. आर्द्रता, डागी आणि माती या शर्तीवर २२०० ते ३५०० पर्यंत भाव असलातरी खरेदीदार सावधतेने खरेदी करत आहेत. सध्या धुळे, लातूर, सोलापूर, सांगली भागातील प्लान्टकडून चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला ३८०० रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र