शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

तुरीसाठी ३०९७ शेतकऱ्यांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 23:43 IST

शासनाच्या हमीदराने तूर खरेदीसाठी नाफेडच्या वतीने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून नोंदणी सुरु असून २६ दिवसात ३ हजार ९७ शेतक-यांनी आॅनलाईन नोंदणी केली असून खरेदीची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देखरेदीची प्रतीक्षा : जाचक अटी, पैशांची निकड म्हणून शेतकऱ्यांचा खुल्या बाजाराकडे कल; लुबाडणूक काही थांबेना

बीड : शासनाच्या हमीदराने तूर खरेदीसाठी नाफेडच्या वतीने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून नोंदणी सुरु असून २६ दिवसात ३ हजार ९७ शेतक-यांनी आॅनलाईन नोंदणी केली असून खरेदीची प्रतीक्षा आहे. बीड जिल्ह्यात ९ जानेवारीपासून तूरखरेदीसाठी नोंदणी सुरू झाली. मात्र या नोंदणीसाठी शेतक-यांना खरीप हंगाम २०१९-२० मधील तूर पिकाचा पीक पेरा तलाठ्यांमार्फत मिळत नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड, जिल्हा मार्केटिंग अधिकारी वाजपेयी, तलाठी संघटनेचे अध्यक्ष व पदाधिका-यांची बैठक झाली. यात केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत माहिती देण्यात आली. शेतमाल हमीभाव खरेदी केंद्रांवर विक्री करण्यासाठी पोर्टलवर नोंदणी आवश्यक आहे. आधारकार्ड, बॅँक पासबुक झेरॉक्स, सातबारा तसेच पीक पेरा आवश्यक असल्याची व या चार दस्तऐवज असल्याशिवाय नोंदणी करू नये अशा सख्त सूचना असल्याची बाब जिल्हा मार्केटिंग अधिका-यांनी निदर्शनास आणून दिली होती. त्यावर चर्चा होऊन तलाठ्यांनी शेतक-यांना पीकपेरा प्रमाणपत्र देण्याचे निर्देश देण्यात आले. दरम्यान तूर खरेदी केंद्र लवकर सुरू करण्याची मागणी आहे.पीक पे-याचा तिढा सुटलापीक पेरा प्रमाणपत्राचा गैरवापर टाळण्यासाठी तलाठ्यांनी छापील नमुन्यातील प्रमाणपत्र न देता स्वहस्ताक्षरातच पीक पेरा प्रमाणपत्र हस्तलिखित सही, शिक्क्यानिशी द्यावेत, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. तलाठ्यांकडून पीक पेरा प्रमाणपत्र मिळू लालगल्याने हा तिढा सुटल्याने नोंदणीत वाढ झाली.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र