शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्याकडून पैसे देण्यास टाळाटाळ; संतप्त शेतकऱ्याने बुलेट टाकली थेट उसाच्या गव्हाणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 18:10 IST

ऊस घेऊन पैसे देण्यास गुळ पावडर कारखान्याची चाल ढकल

माजलगाव: तालुक्यातील रोषणपुरी येथे गुळपावडर उत्पादन करणाऱ्या रूपामाता कारखान्याने शेतकऱ्यांचा ऊस नेला परंतु ते पैसे देण्यास चालढकल करत असल्याने एका शेतकऱ्यांनी मंगळवारी रात्री स्वतःची बुलेट गव्हाणीत सोडली. यापूर्वीही एका शेतकऱ्याने गव्हाणीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

तालुक्यातील रोशनपुरी येथे गुळ पावडर उत्पादन करणाऱा रूपामाता नावाने कारखाना उभा करण्यात आला. हा कारखाना सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांना वेळेत पैसे देत नसल्याच्या तक्रारी होत्या. या कारखान्याने शेतकऱ्यांकडुन १५ दिवसाच्या मुदतीवर ऊस घेऊन गेले होते. परंतु दीड ते दोन महिने झाले असताना संबंधित कारखान्याकडून शेतकऱ्यांना उसाचे बिल मिळत नाही. यामुळे पंधरा दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याने गव्हाणी मध्ये उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

तर शिंपेटाकळी येथील लक्ष्मण गवळी याचा या कारखान्यास दिड दोन महिन्यापूर्वी ऊस गेला होता. अनेक वेळा कारखान्याकडे उसाचे बिल मागून देखील कारखान्याकडून बिलासाठी चालढकल केली जात असल्याचा आरोप लक्ष्मण गवळी यांनी केला आहे. त्याचबरोबर संबंधित शेतकऱ्यास सोमवारी पैसे देतो म्हणून एका बँकेत दिवसभर बसवून घेण्यात आले, परंतु त्यास पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे आज गवळी यांनी कारखान्यात येत पैशांची मागणी करत बुलेट गाडी थेट उसचा रस काढण्यात येतो त्या गव्हाणीत टाकली. काही वेळाने कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी बुलेट बाहेर काढली. 

आम्ही नोव्हेंबर अखेरपर्यंतचे उसाचे बिल आता शेतकऱ्यांना दिले आहे. लवकरच शेतकऱ्यांना बाकीची रक्कम देण्यात येईल.- भाऊसाहेब गुंड,संचालक, रूपामाता कारखाना

अत्यल्प पाऊस त्यात मालाला भाव नसल्याने शेतकरी आधीच तणावात आहे. रूपामाता कारखान्याकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. यापूर्वी अनेक शेतकऱ्यांनी या कारखान्याच्या गव्हाणीमध्ये उड्या घेतलेल्या आहेत. येथे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या कारखान्याचा परवाना रद्द करण्यात यावा.-अॅड नारायण गोले ,शेकाप नेते

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रBeedबीड