शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

परळीच्या वैद्यनाथ मंदिरानंतर आता अंबाजोगाईचे योगेश्वरी मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याचे धमकीपत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 3:08 PM

पत्राद्वारे 50 लाख रुपये देण्याची मागणी. पत्रात नमुद केलेल्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल.

अंबाजोगाई: परळीच्या वैद्यनाथ मंदिरानंतर आता अंबाजोगाईच्या योगेश्वरी मंदिराला आरडीएक्सने उडवण्याची धमकीचे पत्र मिळाल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. 'आपण फार मोठ्या मंदिर संस्थानचे विश्वस्त आहात. आतापर्यंत आपल्या मंदिराला भरमसाठ देणगी रुपाने रक्कम मिळाली आहे. मी फार मोठा नामी गुंड, ड्रग माफिया  आहे. मला  खाजगी व महत्वाच्या कामासाठी 50 लाख रुपयांची गरज आहे. हे पत्र मिळताच पत्त्यावर रक्कम पोहोच करावी, अन्यथा मी योगेश्वरी मंदिर माझ्याकडील आरडीएक्सने उडवीन', अशी धमकी असलेल्या कथित ड्रग्स माफियाच्या धमकीचे  पत्र अंबाजोगाईच्या देवल कमेटी मध्ये शनिवारी रात्री पोहोंचले आहे. दरम्यान, असे पत्र महाराष्ट्रात बऱ्याच मंदिराना पाठविले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे

अंबाजोगाईच्या योगेश्वरी मंदिराला हे पत्र प्राप्त होताच देवल कमिटी चे सचिव अँड.शरद लोमटे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. संस्थानच्या तक्रारीवरुन शहर ठाण्यात आरोपी प्रभाकर नामदेव पुंड (रा.पिंपळगाव,जि. नांदेड) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी  मंदिराला भेट देऊन संपूर्ण मंदिराची पाहणी केली आणि सुरक्षितता राखण्याच्या सुचना दिल्या आहेत. परळीच्या वैद्यनाथ मंदिरापाठोपाठ अंबाजोगाईच्या योगेश्वरी मंदिरास ही असे धमकीचे पत्र प्राप्त झाल्याने पोलिसांना आता या प्रकरणाची पाळेमुळे शोधावी लागणार आहेत.

वैद्यनाथ मंदिराला धमकीचे पत्र

देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या येथील प्रभू वैद्यनाथ मंदिरास एका व्यक्तीने पत्र पाठवून 50 लाख रुपयांची मागणी केली आहे. पन्नास लाख रुपये न दिल्यास  मंदिर उडवून देण्याच्या धमकीचे पत्र  शुक्रवारी वैद्यनाथ मंदिराचे सचिव राजेश देशमुख यांच्या हातात पडले. लागलीच देशमुख यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार नोंदवली. त्यांनतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. तसेच, काल बीडच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकाने मंदिर परिसरात पाहणी केली. तसेच बीड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने मंदिर परिसराची तपासणी केली. श्वानपथकही बोलावण्यात आले होते. 

नांदेडमधून दोघांना ताब्यात घेतलं

दरम्यान, पत्रात उल्लेख असलेल्या नावाबाबत पोलिसांच्या एका पथकाने नांदेड येथे जाऊन दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. एक व्यक्ती विमा प्रतिनिधी असून एकजण बांधकाम व्यावसायिक असल्याची माहिती आहे. दहशतवाद विरोधी पथकाने दोन्ही संशयितांची कसून चौकशी केली. यावेळी दोघांनीही, पुढील दोन दिवसांत आमची कोर्टात महत्वाची तारीख आहे, यातूनच आमच्यासोबत खोडसाळपणा केला गेला असल्याचे सांगितले. कोणीतरी मुद्दामहून आमच्या नावाचा वापर करून पत्र लिहिले असल्याचा आरोपही संशयितांनी केला. 

 

टॅग्स :Beedबीडparli-acपरळीAmbajogaiअंबाजोगाईBlastस्फोट