शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग पाडला बंद  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 18:30 IST

तालखेड ते इरला हा १६  कि.मी. चा रस्ता अत्यंत खराब झालेला असुन या रस्त्याने पायी चालणे देखील अत्यंत कठीण झाले आहे. यामुळे हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा या मागणीसाठी या रस्त्यावरील  गावातील नागरिकांनी एकत्र येत सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान तालखेड फाटा येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-२२२ वर  रस्ता रोको आंदोलन केले.

ऑनलाईन लोकमत 

माजलगाव (जि. बीड) दि. २८ :  तालखेड ते इरला हा १६  कि.मी. चा रस्ता अत्यंत खराब झालेला असुन या रस्त्याने पायी चालणे देखील अत्यंत कठीण झाले आहे. यामुळे हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा या मागणीसाठी या रस्त्यावरील  गावातील नागरिकांनी एकत्र येत सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान तालखेड फाटा येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-२२२ वर  रस्ता रोको आंदोलन केले. सुमारे दोन तास हे आंदोलन चालल्याने महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजुने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याने वाहतुक सुरळीत करतांना पोलीस प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागली.  

माजलगांव सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अंतर्गत तालखेड ते इरला मजरा हा रस्ता येतो. हा रस्ता गेवराई मतदार संघातील असल्यामुळे माजलगाव सा.बां. उपविभाग हा रस्ता गेवराई विभागाकडे वर्ग केला असल्याचे सांगतात. तर गेवराई सा.बां. उपविभाग रस्ता आमच्याकडे अजुन वर्ग झाला नसल्याचे  सांगतात. यामुळे या रस्त्याबाबत नेमका कोणाला जाब विचारावे या अडचणीत येथील ग्रामस्थ आहेत. 

तालखेड परिसर हा माजलगांव तालुक्यात येतो परंतु मतदानासाठी गेवराई मतदार संघात येतो. यामुळे राजकीय पुढा-यांचेही इकडे कमीच लक्ष आहे. रोज या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात शाळकरी मुल आणि मुली जातात. यातच आता या  रस्त्यावरून पायी चालणे देखील कठीण झाले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी अखेर येथील ग्रामस्थांनी ' तालखेड सर्कल रस्ता जनआंदोलन कृति समिती स्थापन' करुन थेट महामार्ग रस्तारोको आंदोलनाचा मार्ग स्विकारला. 

आंदोलकांची प्रशासनाकडुन बराचकाळ कसल्याही प्रकारची दखल घेतली न गेल्यामुळे आंदोलन लांबत गेले.  यावेळी  रस्त्याच्या दोन्ही बाजुने  मोठया प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शेवटी पोलीसांनी हस्तक्षेप केल्यानंतर आंदोलन थांबले आणि तब्बल तीन तासानंतर वाहतुक सुरळीत झाली.  

पोलिसांचा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न आंदोलन खूप वेळ चाल्याने  पोलीसांनी  हस्तक्षेप करीत आंदोलन थांबवा नाहीतर  कारवाईला सामोरे जा अशी तंबी दिली. यावर आंदोलनकर्ते जास्तच भडकले, प्रशासनाकडुन कोणीही आमच्या आंदोलनाची दखल घेण्यास आले नाही अस म्हणत त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले. पोलीस व आंदोलक यांच्यात यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. 

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न होताआंदोलनकर्त्यांना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होण्याची काळजी घेण्याबाबत सांगीतले होते. आम्हाला दहा मिनिटे रस्त्यावर बसुन आंदोलन करु द्यावे त्यांनी सांगितले परंतु दहा मिनिटांनंतरही ते बसून राहिले. यामुळे परिस्थितीचा अंदाज घेवून आम्हाला त्यांना बाजुला हटवावे लागले. - संजय पवार, पोलीस निरीक्षक, ग्रामिण पोलीस ठाणे माजलगांव