शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीवरील अत्याचार प्रकरण; शिक्षकाला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 19:07 IST

जालना येथे क्रीडा स्पर्धेसाठी नेऊन एका विद्यार्थिनीवर क्रीडा शिक्षक शाम वारकड याने अत्याचार करून वाच्यता न करण्याची धमकी दिली होती.

ठळक मुद्देआरोपीने यापूर्वीही दिला होता माफीनामा  निलंबनाचा प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठविला      

अंबाजोगाई (जि. बीड) :  विद्यार्र्थिनीवर अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या क्रीडाशिक्षक शाम वारकड याला २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. १ न्या. एस. एस. सापटणेकर यांच्या न्यायालयाने दिले.

जालना येथे क्रीडा स्पर्धेसाठी नेऊन एका विद्यार्थिनीवर क्रीडा शिक्षक शाम वारकड याने अत्याचार करून वाच्यता न करण्याची धमकी दिली होती. अत्याचाराच्या  घटनेनंतर सदरील विद्यार्थिनी शाळेत शांत राहू लागली. ती निराश व उदासीन वाटू लागल्याने तिच्या वर्गशिक्षिकेने तिची चौकशी केली. वारंवार केलेल्या चौकशीनंतर पीडित विद्यार्थिनीने अत्याचाराची माहिती शिक्षिकेस सांगितली. शिक्षिकेने या घटनेची माहिती मुख्याध्यापक व शालेय समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर मुख्याध्यापक व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी हा प्रकार तिच्या पालकांना सांगून गुन्हा दाखल करण्यास सांगितले. अंबाजोगाई पोलिसांनी बुधवारी आरोपी शिक्षकाला अटक केली. गुरुवारी सकाळी अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. १ न्या. एस. एस. सापटणेकर यांच्या न्यायालयासमोर  तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांनी हजर केले असता न्यायालयाने त्याला २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

आरोपीने यापूर्वीही दिला होता माफीनामा  शालेय विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या शाम वारकड या क्रीडा शिक्षकाने गुरू-शिष्य नात्याला कलंक लावून आपली विक्षिप्त मनोवृत्ती समाजासमोर आणली आहे. हा  क्रीडा शिक्षक यापूर्वीही अशा प्रकरणांमुळे माफी मागून सेवेत होता. शाम याचे वडील पोलिस दलात होते तर त्याचा मोठा भाऊ वरिष्ठअधिकारी आहे. उद्धट वर्तनामुळे इतर शिक्षक त्याच्यापासून दूर राहत असत. लातूर येथे त्याने असाच गैरप्रकार केल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्याच्याकडून माफीनामा लिहून घेण्यात आला होता व त्याची बदली अंबाजोगाईत करण्यात आली होती. शाम याला नाशिक येथील एका संस्थेने राष्ट्रीय आदर्श क्रीडा शिक्षक म्हणूनही सन्मानित केले होते. 

निलंबनाचा प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठविला      शालेय अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केलेला शिक्षक शाम वारकड याला पोलिसांनी  अटक केल्यानंतर संस्थेने गंभीर दखल घेत या शिक्षकाला निलंबित करण्याचा ठराव घेतला व तो ठराव शिक्षणाधिकाऱ्यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसBeedबीड