शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

फूस लावून पळवून नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; बीडमधून आरोपी-मुलीस घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 16:41 IST

या प्रकरणी पुढील तपास पिंक मोबाईल पथकाकडे देण्यात आला आहे.

दिंद्रुड (बीड) : एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना 20 जून रोजी माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस ठाणे हद्दीत घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी रविवारी रात्री कारवाई करत बीड येथून अल्पवयीन मुलगी आणि आरोपीस ताब्यात घेतले आहे. सचिन तोंडे ( रा. नागझरी ता. केज ) असे आरोपीचे नाव आहे. सदर गुन्ह्यात बलात्कारासह पोस्को गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पिंक मोबाईल पथकाकडे दिला असल्याचे दिंद्रुड पोलिसांनी सांगितले.

सविस्तर वृत्त असे की, दिंद्रुड पोलीस हद्दीतील एक 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला केज तालुक्यातील नागझरी येथील सचिन तोंडे या युवकाने फूस लावून पळवून नेले होते. मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून 21 जून रोजी दिंद्रुड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिंद्रुड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राडकर यांनी तात्काळ दखल घेत मोबाईल लोकेशनवरून तपास सुरु केला. दरम्यान, हे युगल बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत असल्याची गोपनीय माहिती रविवारी पोलिसांना मिळाली. 

यावरून रविवारी रात्री पोलिसांनी छापा टाकत अल्पवयीन मुलगी आणि आरोपीस ताब्यात घेतले.  दरम्यान, पोलीस तपासात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची बाब उघड झाली. त्यामुळे आरोपीच्या विरोधात बलात्कारासह पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास माजलगाव येथील पिंक मोबाईल पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक निशिगंधा खुळे, पोलीस कॉन्स्टेबल माया मस्के करत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड