शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

रमेश आडसकरांचा विरोधकांना ‘हाबाडा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 00:24 IST

उमेदवारी अर्ज दाखल करताना भव्य रॅली काढून भाजपाचे उमेदवार रमेश आडसकर यांनी सलामीलाच विरोधकांना ‘हाबाडा’ दिला आहे.

ठळक मुद्देराष्टÑवादी काँग्रेसमधील अनेक दिग्गजांचा भाजपत प्रवेश : भाजपाच्या विराट रॅलीचीच अजूनही होतेय माजलगाव मतदारसंघात चर्चाच चर्चा

पुरुषोत्तम करवा।लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : माजलगाव विधानसभा निवडणुकीच्या अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २५ एवढे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक राहिले. वंचितच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाल्याने या निवडणुकीत आता भाजपाराष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्येच खरी लढत होणार असल्याने येथील निवडणूक अटीतटीची होईल, असे चित्र आज तरी दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना भव्य रॅली काढून भाजपाचे उमेदवार रमेश आडसकर यांनी सलामीलाच विरोधकांना ‘हाबाडा’ दिला आहे. भाजपाच्या या विराट रॅलीचीच माजलगाव मतदारसंघात जिकडे तिकडे चर्चाच चर्चा चालू आहे.माजलगाव मतदार संघात माजलगावसह धारूर व वडवणी तालुका येतो. माजलगाव तालुक्यातील १२१, धारूर तालुक्यातील ४५ व वडवणी तालुक्यातील ६८ गावांचा समावेश आहे. या मतदारसंघात ३ लाख ३१ हजार १० एवढे मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीपेक्षा २ हजार ८४६ नवीन मतदारांची संख्या वाढली. यासाठी विधानसभा निवडणुकीसाठी ६४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १४ उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाले होते.अपक्ष उमेदवारांचा आपल्याला किंवा विरोधकांना फायदा-तोटा होईल हे पाहुन अपक्षांची मनधरणी दोन दिवसांपासून भाजप - राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांकडून करण्यात येत होती. त्यात अनेक अपक्षांचे उमेदवारी अर्ज काढण्यात ते यशस्वी देखील झाले. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर या मतदारसंघात एवढे उमेदवार शिल्लक राहिले.या मतदारसंघात मुख्य लढत भाजप - शिवसेना व मित्र पक्षाचे उमेदवार रमेश आडसकर व राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे उमेदवार प्रकाश सोळंके यांच्यातच होईल, असे चित्र आज तरी पहावयास मिळत आहे. आडसकर हे मोहन जगताप व ओमप्रकाश शेटे यांचे मन वळविण्यात यश्स्वी झाले आहेत. भाजपाची जुनी फळी आ. आर.टी. देशमुख यांच्यापासून दुरावली होती, आता त्यांना सोबत घेऊन फिरत असल्याने त्याचा फायदा आडसकरांना होऊ शकतो. विरोधकांना आडसकर यांच्या विरोधात पाहिजे, असा ठोस मुद्दा मिळालेला नाही तर राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतील अनेक जण भाजपासोबत गेल्याने तसेच आडसकर यांचा धारूर तालुक्यात संपर्क चांगला असल्याचा फायदा आडसकरांना होऊ शकतो. आडसकरांचा स्वभाव हा सर्वात मिसळून राहण्याचा असल्याने आडसकर यांच्याभोवतीची कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची फौज दिवसेंदिवस वाढतच आहे.पदाधिकारी भाजपत गेल्याने अडचणीदुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रकाश सोळंके यांनी आतापर्यंत पाच वेळा विधानसभा निवडणूक लढवली असून, त्यापैकी तीन वेळा या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी १५ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी राज्यमंत्री पद देखील भुषवले होते.चिडचिड्या स्वभावामुळे नागरिक त्यांना बोलण्यास धजावत नाहीत. मागील आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसºया फळीतील नेते व प्रकाश सोळंके यांचे नातेवाईक भाजपात गेल्याने त्यांची अडचण झाली. ही निवडणूक त्यांच्यासाठी कसोटीची दिसत आहे.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस