शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी राजेश्वर चव्हाण यांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 17:01 IST

प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे,पालकमंत्री  धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत दिले नियुक्तीपत्र

बीड : - बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी अंबाजोगाई तालुक्यातील ज्येष्ठ नेते राजेश्वर चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  आज मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खा.  सुप्रिया सुळे यांच्या हस्ते व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह आजीमाजी आमदारांच्या उपस्थितीत चव्हाण यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

राजेश्वर  चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापने पासूनचे सदस्य असून खा. पवार यांचे  निष्ठावंत मानले जातात. या पूर्वी म्हाडाचे सदस्य, बीड जिल्हा परिषदेचे सदस्य आदी पदे त्यांनी भूषवली आहेत. राजेश्वर चव्हाण यांच्या निवडीचे सर्व स्तरातुन स्वागत होत आहे. दरम्यान, नवनियुक्त जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी, खा. शरद पवार यांचे विचार जोपासत जिल्ह्यात पक्षाचे बळकटीकरण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू असा विश्वास व्यक्त करत, जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्याबद्दल सर्व पक्षश्रेष्ठींचे आभार व्यक्त केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, आ. प्रकाश सोळंके, आ. बाळासाहेब आजबे, माजी आमदार अमरसिंह पंडित, मुंबई बाजार समितीचे अध्यक्ष अशोक डक, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, परळी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष गोविंद देशमुख, युवती आघाडीच्या अध्यक्ष सक्षणा सलगर आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसBeedबीड