शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

राजापूर वाळूसाठा; उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांचे अक्षम्य दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 00:19 IST

गेवराई तालुक्यातील राजापूर, गंगावाडी परिसरात जिल्हाधिकाºयांनी स्वत: कारवाई करत मोठ्या प्रमाणात वाळू साठा जप्त केला होता.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी काढले फर्मान : प्रभोदय मुळे, संगीता चव्हाण यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

बीड : गेवराई तालुक्यातील राजापूर, गंगावाडी परिसरात जिल्हाधिकाºयांनी स्वत: कारवाई करत मोठ्या प्रमाणात वाळू साठा जप्त केला होता. या प्रकरणी कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी प्रशानातील संबंधीत अधिका-यांची झाडाझडती सुरु केली आहे. बीड उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळेंसह गेवराई तहसीलदार संगीता चव्हाण व इतर संबंधित अधिकाºयांवर कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. तीन दिवसांत उत्तर न दिल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील नोटिसीमध्ये नमूद करण्यात आले आहे.गेवराई तहसीलदार, नायब तहसीलदार, आणि तलवड्याचे मंडळ अधिकारी व राजापूर येथील तलाठी यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळू साठा होत असताना प्रशासनाकडून कारवाई का करण्यात आली नाही? तसेच वाळूसाठे व वाहतुकीच्या संदर्भात तक्रारी आल्यानंतर त्यावर कार्यवाही करणे अपेक्षीत असताना संबंधित अधिकाºयांनी कार्यवाही व उपाययोजना का केली नाही, अशी विचारणा करणारी कारणे दाखवा नोटीस संबंधित अधिकाºयांना पाठवली आहे.गेल्या महिन्यामध्ये राजापूर येथील सातभाई यांच्या तक्रारीवरून विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या निर्देशानुसार स्वत: जिल्हाधिकाºयांनी राजापूर येथील वाळू घाटांवर कारवाई करत २२०० ब्रासपेक्षा अधिक वाळू जप्त करुन बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालय व गेवराई येथील विश्रामगृह परिसरात जमा केली आहे.त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळू साठे हे स्थानिक महसूल व पोलीस प्रशासनास हाताशी धरून केल्याचे स्पष्ट होत होते. त्यामुळे आता जिल्हाधिकाºयांनी महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकाºयांची झाडाझडतीला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. बीडचे उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, गेवराई तहसीलदार संगीता चव्हाण, नायब तहसीलदार प्रशांत जाधव, तलवाड्याचे मंडळ अधिकारी राजेंद्र माने, राजापूरचे तलाठी डी.ए. आंधळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळू साठा व वाहतूक होण्यामागची कारणे काय याचा खुलासा तीन दिवसांत म्हणेज शुक्रवारपर्यंत देणे बंधनकारक आहे. जर खुलासा दिला नाही तर आपणाला काही सांगायचे नाही असे गृहीत धरुन शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे, असे या नोटिसीमध्ये म्हटले आहे. या कारवाईमुळे वाळू माफियांशी साटेलोटे असणाºया महसूल व पोलीस प्रशासनातील बढ्या अधिकाºयांचे धाबे दणाणले आहे.बीड शहरात देखील जप्त केला होता वाळूसाठामागील वर्षी बीड शहरातील बिंदूसरा नदीपात्रालगतच्या मोकळ््या जागेत शेकडो ब्रास वाळू जप्त केली होती. ही कारवाई तत्कालीन उपविभागीय अधिकारी विकास माने व बीड तहसीलदार अविनाश शिंगटे यांनी केली होती.या प्रकरणी संबंधित जागा मालकांना दंड भरण्याच्या नोटीस तहसीलदारांमार्फत दिल्या होत्या मात्र, उपविभागीय अधिकारी विकास माने यांची बदली झाल्यनंतर या प्रकरणी अर्थपूर्ण संबंधातून कारवाई केली नसल्याची सूत्रांची माहिती आहे.

टॅग्स :Beedबीडcollectorजिल्हाधिकारीsandवाळू