शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात पावसाचा टक्का निम्म्यावर घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 23:55 IST

बीड : जूनमध्ये चांगले संकेत देणाऱ्या पावसाने पहिल्या आठवड्यात मागील वर्षीच्या सरासरीच्या पुढे जात असतानाच मागील सात दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने यंदा ५० टक्के तूट निर्माण झाली आहे. हा अनुशेष आगामी काळात पडणारा पाऊस भरुन काढेल अशी आशा सर्वांना आहे. दरम्यान, सोमवारी दुपारपासून आभाळ भरुन आले. चांगला पाऊस पडेल अशी ...

बीड : जूनमध्ये चांगले संकेत देणाऱ्या पावसाने पहिल्या आठवड्यात मागील वर्षीच्या सरासरीच्या पुढे जात असतानाच मागील सात दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने यंदा ५० टक्के तूट निर्माण झाली आहे. हा अनुशेष आगामी काळात पडणारा पाऊस भरुन काढेल अशी आशा सर्वांना आहे. दरम्यान, सोमवारी दुपारपासून आभाळ भरुन आले. चांगला पाऊस पडेल अशी आशा बाळगणाºया बीडकरांना हलक्या स्वरुपाच्या पावसाने काहीअंशी सुखावले.

गेवराई तालुक्यात सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास पाडळसिंगी व परिसरात तब्बल एक तास पाऊस झाल्याने ओढ, नाल्या, रस्त्यांवर पाणी झाले होते. सिरसदेवी परिसरात अर्धामसला, रानमळा, खांडवी, भेंडटाकळी, पाडूळ्याची वाडी येथे पाच वाजता सरी कोसळल्या. यामुळे तूर, मका, कापूस, सोयाबीन या पिकांना उगवण क्षमतेसाठी दिलासा मिळाला आहे. गेवराई शहरातही सकाळपासून चार टप्प्यांमध्ये सौम्य पावसाने हजेरी लावली.

उपळी, गावंदरा येथे काही वेळ तर भोगलवाडी, तेलगाव परिसरात रिमझिम पावसाने हजेरी लावली. या भागात कपाशी लागवड केलेल्या शेतकºयांना मात्र दिलासा मिळाला आहे. शिरुर कासार तालुक्यात दुपारी काही भागात तासभर रिमझिम पाऊस झाला. १५ दिवसानंतर पाऊस झाल्याने शेतकºयांमध्ये समाधानाचे वारे होते. मात्र जोरदार पावसाची सर्वाांनाच प्रतीक्षा आहे.

टॅग्स :BeedबीडRainपाऊसMarathwadaमराठवाडाmonsoon 2018मान्सून 2018