शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात पावसाची ओढ; कडधान्याचा उतारा ४० टक्के येणार कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 00:35 IST

जिल्ह्यातील वरुणराजाचा कृपा झालेली नसल्यामुळे अजूनही दुष्काळ सदृष्य परिस्थीत कायम आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला थोड्या प्रमाणात झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या.

ठळक मुद्देमूग, उडीद इतर कडधान्याचे क्षेत्र घटले : पुढील काळात पाऊस न पडल्यास कापूस, सोयाबीन पिकांना धोका

बीड : जिल्ह्यातील वरुणराजाचा कृपा झालेली नसल्यामुळे अजूनही दुष्काळ सदृष्य परिस्थीत कायम आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला थोड्या प्रमाणात झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. मात्र, पुढील काळात पावसाने ओढ दिल्यामुळे मुख्य पिक असलेल्या कापूस, सोयाबीनवर मोठ्याप्रमाणात परिणाम झाला आहे. त्याचसोबत मूग, उडीद व इतर कडधान्याच्या उत्पादनात घट होऊन उतारा कमी येणार असल्याचे चित्र आहे.खरीप हंगामात यावर्षी तुरळक पावसावर कापूस, सोयाबीन, बाजरी, तूर, मूग, उडीद यासह इतर पिकांचा पेरा शेतकऱ्यांनी केला होता. मागीलवर्षीच्या तुलनेत यावर्षी सोयबीन व कापूस या पिकांचा पेरा कमी झाला आहे. त्याचसोबत गतवर्षीच्यापेक्षा जवळपास ५ टक्के क्षेत्रावर खरीप पिकांचा पेरा कमी झाला आहे. जुलै ते आॅगस्ट महिन्याच्या कालावधीत तुरळक प्रमाणात पाऊस झाल्यामुळे काही पिकांना जिवनदान मिळाले आहे. मात्र, पुन्हा पावसाने उघडीप दिल्यामुळे पिकांवर परिणाम जाणवत आहे. सोयबीन फुलोºयात आहे मात्र, पाणी कमी पडत असल्यामुळे फुले गळून पडत आहेत. त्यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.ऐकूण खरीप क्षेत्राच्या तुलनेत दरवर्षी जवळपास ६० हजार क्षेत्रावर कडधान्याचा पेरा केला जातो. या क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात यावर्षी घट झाली आहे. तसेच कडधान्याची पिकं ही ६० दिवसांची असल्यामुळे आता फुले व काही ठिकाणी शेंगा भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. या कालावधीत पाण्याची आवश्यता आहे. मात्र, पाणी उपलब्ध नसल्यामुळे कडधान्यच्या उत्पादनात अंदाजे ४० टक्के घट येण्याची शक्यता कृषी विभागाच्या वतीने वर्तवण्यात येत आहे. तसेच पुढील काळात पावसाची अशीच परिस्थिती राहिली तर सर्वच पिकांच्या उपत्पादनात घट होणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. अशा परिस्थितीमध्ये देखील शेतकरी पिके जगविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :BeedबीडRainपाऊस