शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय वरदहस्त असलेल्या जुगार अड्ड्यांवर बीडमध्ये छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 17:22 IST

जुगार अड्डा शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या जागेतील पत्र्याच्या बंद शेडमध्येच सुरु असल्याचे समोर आले आहे. मात्र, खांडे यांनी या व्यवसायाशी आपला संबंध नसल्याचा खुलासा केला

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेची दोन ठिकाणी कारवाई शिवसेना जिल्हाप्रमुखांकडून खुलासा जारी

बीड : शहरातील फुलाईनगर परिसरात, तसेच नामलगाव फाट्यावरील एका शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री आणि रविवारी दुपारच्या सुमारास छापा मारला. सलग दोन दिवस राजकीय वरदहस्त असलेल्या जुगार अड्ड्यांवर झालेल्या कारवाईमुळे अवैध धंद्येवाल्यांचे धाबे दणाणले आहे. 

शनिवारी रात्री साडेसात वाजता बीड शहरातील फुलाईनगर भागातील जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यात २८ जुगाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. दरम्यान हा जुगार अड्डा शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या जागेतील पत्र्याच्या बंद शेडमध्येच सुरु असल्याचे समोर आले आहे. मात्र, खांडे यांनी या व्यवसायाशी आपला संबंध नसल्याचा खुलासा करत ही जागा आपण भाडेतत्वार दिली होती, असा खुलासा केला आहे.

पोलिसांनी जुगार अड्ड्यावरुन एका लाख २५ हजार ५४० रुपयांची रोकड, ३१ हजार ४० रुपयांचे ९ मोबाईल असा एकूण एक लाख ५६ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक प्रमुख सहायक निरीक्षक आनंद कांगुणे व बीड शहर पोलीस ठाणे प्रमुख गजानन जाधव व कर्मचाऱ्यांनी संयुक्तरीत्या केली.  अवैध धंद्यांच्या संदर्भात पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या. त्या अनुषंगाने त्यांनी  पथकांना कारवाईचे आदेश दिले होते.

माझ्या बदनामीचा डाव -कुंडलिक खांडेशिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी ही जागा आपल्या मालकीची असली तरी २४ जून २०२० रोजी तीन महिन्यांसाठी भाडेतत्त्वावर सुभाष बापमारे यांना दिली होती, असा खुलासा केला आहे. या जागेतील व्यवसायाशी आपला संबंध नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आपली बदनामी करण्याचा हा डाव असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. 

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस