शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

अंबाजोगाईतील कत्तलखान्यावर छापा; जनावरांच्या सुटकेसह सव्वाबारा लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 21:57 IST

अपर अधीक्षक कविता नेरकर यांच्या सतर्कतेमुळे वाचला ६६ गोवंशीय जनावरांना जीव

अंबाजोगाई - गुप्त माहितीच्या आधारे अंबाजोगाईच्या अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (पवार) यांनी गुरुवारी (दि.०३) रात्री विशेष पथकाला पाठवून शहरातील बाराभाई गल्लीतील कत्तलखान्यावर छापा मारला. यावेळी कत्तलीसाठी आणलेल्या ६६ गोवंशीय जनावरांची पोलिसांनी सुटका केल्याने त्यांचा जीव वाचला आहे. पोलिसांनी १२ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करून सहा जणांवर गुन्हा नोंदवला. 

अंबाजोगाई शहरातील बाराभाई गल्लीतील नगर परिषदेच्या गाळ्यातील कत्तलखान्यातून चोरीछुपे नियमित अनेक गोवंशीय जनावरांची कत्तल केली जाते. गुरुवारी देखील या ठिकाणी कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणात गोवंशीय जनावरे आणल्याची माहिती गुप्त माहिती अपर अधीक्षक कविता नेरकर (पवार) यांना मिळाली होती. सदर माहिती गांभीर्याने घेत नेरकर यांनी त्यांच्या विशेष पथकातील एपीआय रवींद्र शिंदे, पोलीस कर्मचारी तिडके, दौंड, तागड, देवकते, सुरवसे, महिला कर्मचारी राठोड, गायकवाड, ग्रामीण ठाण्याचे पीएसआय केंद्रे, खंदारे, राउत आणि आरसीपीचे कर्मचारी यांना रात्री १०.३० वा. तातडीने बाराभाई गल्लीत पाठवून कत्तलखान्यावर छापा मारला. या ठिकाणाहून पोलिसांनी कत्तलीसाठी आणलेल्या तब्बल ६६ गोवंशीय जनावरांची सुटका केली. यावेळी पोलिसांनी एका पिकअप टेम्पोसह (एमएच २६ एच २३०९) एकूण १२ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

घटनास्थळावर आढळून आलेल्या फय्याज अब्दुल करीम कुरेशी, अमीर मौला कुरेशी, लायक कुरेशी, मुक्तार कुरेशी, फारूक कुरेशी आणि दिशान हाफिज या सहा जणांवर पो.ह. अनिल दौंड यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. दरम्यान, अपर अधीक्षक कविता नेरकर यांनी सतर्कता दाखवत ६६ जनावरांचा जीव वाचवल्याने शहरातील प्राणीमित्रांसह नागरिकांनी त्यांचे कौतुक केले आहे.

जनावरांच्या बचावासाठी पोलीस रात्रभर धावलेपोलीस पथकाने छापा मारून जनावारंची सुटका केली तर खरी, परंतु त्यांना सुरक्षित स्थळी पाठवणेही गरजेचे होते. अर्ध्या रात्रीपर्यंत पोलिसांनी कत्तलखान्याच्या दुर्गंधीयुक्त वातवरणात बसून जनावरांच सांभाळही केला आणि पंचनामाही केला. त्यानंतर जनावरांना टेंपोमध्ये घालून टप्प्याटप्प्याने वरवटी, परळी आणि घाटनांदूर यथील गोशाळेत सोडण्यात आले. पोलिसांचे हे काम शुक्रवार दुपारपर्यंत सुरु होते.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी