शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

माजलगावात आठवडी बाजाराच्या जागेचा प्रश्न अधांतरीच; नेत्यांना पडला आश्वासनांचा विसर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 14:43 IST

शहरातील आठवडी बाजाराच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. नगर परिषदेच्या निवडणुकीतही हा मुद्दा गाजला होता. मात्र आता या प्रश्नाचा सर्वच नेत्यांना  विसर पडल्याची स्थिती आहे. यामुळे आठवडी बाजारासाठी येणारे शेतकरी, व्यापारी व शहरवासियांना मोठा त्रास होत असून याचा थेट परिणाम शहराच्या बाजार पेठेवर होत आहे.

-  पुरूषोत्तम करवा

माजलगाव  (बीड ) : शहरातील आठवडी बाजाराच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. नगर परिषदेच्या निवडणुकीतही हा मुद्दा गाजला होता. मात्र आता या प्रश्नाचा सर्वच नेत्यांना  विसर पडल्याची स्थिती आहे. यामुळे आठवडी बाजारासाठी येणारे शेतकरी, व्यापारी व शहरवासियांना मोठा त्रास होत असून याचा थेट परिणाम शहराच्या बाजार पेठेवर होत आहे.

शहरात तीस वर्षांपूर्वी हनुमान चौक भागात आठवडी बाजार भरत असे. वाढती नागरी वस्ती व अपुरी जागा यामुळे हा आठवडी बाजार काही राजकीय मंडळींनी गजानन मंदिर रोडवर हलवला. मात्र, या भागातील नागरिकांना बाजाराचा मोठा त्रास होत असल्यामुळे त्यांनी बाजार येथून हलविण्याची नगर पालिकेस विनंती केली. पालिकेने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेवटी सामाजिक कार्यकर्ते जगदीश साखरे यांनी या विरुद्ध न्यायालयात दाद मागितली असता न्यायालयाने या भागात बाजार भरवू नये असे आदेश दिले. यानंतर मनूर रोड व तेथून बीअँडसी रोड असा बाजाराच्या जागेचा प्रवास झाला आहे. 

बाजार निवडणुकीचा विषय आठवडी बाजाराच्या प्रश्नावर मागील दहा ते पंधरा वर्षांपासून नगर पालिका निवडणूक लढल्या जात आहेत. मात्र निवडणूक संपताच हा विषय थंड बसत्यात जातो. विधानसभा निवडणुकीत आमदार आर. टी. देशमुख यांनी हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. तसेच दीड वर्षापूर्वी पालिका निवडणुकीत देखील विविध राजकीय पक्षांनी या प्रश्नाचे भांडवल केले. मात्र अद्याप कोणीही हा प्रश्न सोडविला नाही. 

अर्धा बाजार झाला स्थलांतरित जागेचा प्रश्न सुटत नसल्याने सध्याच्या ठिकाणी निम्मा देखील बाजार भरत नाही. यामुळे अर्धा बाजार तर केसापुरी कॅम्प येथे स्थलांतरित झाला आहे. याचा परिणाम शहराच्या बाजार पेठेवर झाला आहे. आजूबाजूच्या जवळपास 50 खेड्यातील नागरिक बाजारामुळे शहराच्या संपर्कात होते त्यांचे शहरात येणे आता कमी झाले आहे. यामुळे बाजारपेठ बकाल पडत आहे.

जनविकास आघाडीला पडला विसरबाजाराच्या जागेच्या प्रश्नावरून निवडणुकी आधी मोहन दादा जगताप मित्रमंडळाने आंदोलने केली. यानंतर त्यांनी जनविकास आघाडीतून निवडणूक लढवली. बाजार प्रश्नावरील आंदोलनाचा यात त्यांना फायदा झाला व ते सत्तेत आले. मात्र आता त्यानाही या प्रश्नाचा विसर पडला आहे.

जागेचा शोध सुरु आहे शहरातील बाजारासाठी कायमस्वरूपी जागेचा शोध घेतला  जात आहे. लवकरच जागा उपलब्ध होईल.- सहाल चाऊस, अध्यक्ष, नगर परिषद

टॅग्स :vegetableभाज्याBeedबीड