शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
2
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
3
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
4
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
5
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
6
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
7
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
8
“वर्षानुवर्षे उत्तर मुंबईची सेवा करत राहीन”; पियूष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास, उमेदवारी अर्ज भरला
9
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
10
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
11
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
12
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
13
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
14
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
15
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
16
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
17
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
18
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
19
May Born Astro: मे महिन्यात जन्मलेले लोक म्हणजे चेहऱ्याने लोभस, डोक्याने तापट आणि लहरी स्वभावाचे मिश्रण!
20
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार

पूर्णाहुती महापूजेने श्रीयोगेश्वरी मार्गशीर्ष महोत्सव सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 12:17 AM

महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाची सांगता बुधवारी दुपारी एक वाजता होमहवन व पूर्णाहुती महापूजेने झाली.

ठळक मुद्देयात्रेलाही भाविकांची गर्दी : हजारो भाविकांनी घेतले योगेश्वरी देवीच्या पालखीचे दर्शन

अंबाजोगाई : महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाची सांगता बुधवारी दुपारी एक वाजता होमहवन व पूर्णाहुती महापूजेने झाली. तहसीलदार संतोष रूईकर व कमल रूईकर यांच्या उपस्थितीत पूर्णाहुती व महापूजा झाली. महापूजेनंतर योगेश्वरी देवीच्या होमात श्रीफळ टाकण्यासाठी भाविकांची एकच गर्दी झाली होती. महापूजेनंतर देवीच्या दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या.योगेश्वरी देवीच्या भरलेल्या यात्रेला भाविकांची मोठी गर्दी झाली होती. तसेच रात्री निघालेल्या योगेश्वरी देवीच्या पालखीचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले.श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष महोत्सव ३ ते ११ डिसेंबर या कालावधीत साजरा झाला. बुधवारी महोत्सवाची सांगता होमहवन व पूर्णाहुती महापूजेने झाली. तहसीलदार संतोष रूईकर व कमल रूईकर यांनी महापूजा करून पूर्णाहुती टाकली. यावेळी योगेश्वरी देवल कमिटीचे सचिव भगवानराव शिंदे, मुख्य पुजारी सारंग पुजारी, विश्वस्त अक्षय मुंदडा, पृथ्वीराज साठे, राजकिशोर मोदी, कमलाकर चौसाळकर, अ‍ॅड. शरद लोमटे, गिरीधारीलाल भराडिया, प्रा. अशोक लोमटे, उल्हास पांडे, श्रीराम देशपांडे, संजय भोसले, डॉ. संध्या जाधव, पूजा राम कुलकर्णी, गौरी जोशी यांच्यासह योगेश्वरी देवीचे मानकरी, पुरोहित उपस्थित होते.या पूर्णाहुतीनंतर आराध बसलेल्या महिलांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. बुधवारी योगेश्वरी देवीच्या यात्रेसाठीही भाविकांनी मोठी गर्दी केली. अंबाजोगाई व पंचक्रोशीतील दर्शनासाठी भाविकांची मोठी संख्या मंदिर परिसरात झाल्याने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवावा लागला. सायंकाळी ७ वाजता योगेश्वरी देवीची पालखी मंदिरातून निघाली. ही पालखी मंडीबाजार, पाटील चौक, भट गल्ली, जैन गल्ली, गौंड गल्ली मार्गे देशपांडे गल्लीतील देवघर, कुत्तरविहीर मार्गे पुन्हा मंदिरात पोहोचली. पालखी सोबत आराधी भजनी मंडळ, महिलांचे भजनी मंडळ, ढोलताशे, झांज पथक व शहरात करण्यात आलेली विद्युत रोषणाई लक्ष वेधणारी ठरली.

टॅग्स :BeedबीडAmbajogaiअंबाजोगाईReligious programmeधार्मिक कार्यक्रम