शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-अमरावती एक्स्प्रेस पुन्हा सुरु झाल्याने प्रवाशांची झाली सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2022 19:06 IST

गेल्या 33 महिन्यापासून बंद असलेली पुणे -अमरावती, अमरावती- पुणे  एक्स्प्रेस रेल्वे गाडी पूर्ववत 

- संजय खाकरेपरळी (बीड): पुणे-अमरावती एक्सप्रेस रेल्वे गाडी चे शनिवारी सकाळी आठ वाजता परळी रेल्वे स्टेशनमध्ये आगमन झाले. ही रेल्वे गाडी पूर्वीप्रमाणे परळी मार्गे अमरावतीकडे धावली. या रेल्वेगाडीमुळे पुण्याहून परळीला येणाऱ्या प्रवाशांची सोय झाली. तसेच अमरावतीहून परळीमार्गे परत पुण्याला जाणाऱ्या अमरावती -पुणे या रेल्वे गाडीमुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. 

कोरोना प्रादुर्भावामुळे 22 मार्च 2020 पासून  पुणे- अमरावती व अमरावती -पुणे एक्सप्रेस गाडी तब्बल 33 महिने बंद होती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. नांदेड- पनवेल ही पुण्याला परळी मार्गे धावणारी रेल्वेगाडी नेहमी फुल्ल असते. त्यामुळे प्रवाशांची  गैरसोय व्हायची. आता ही गैरसोय दूर झाली आहे. आठवड्यातून दोन दिवस पुणे -अमरावती आणि अमरावती- पुणे रेल्वेगाडी सुरु झाली आहे. या निर्णयाचे परळी रेल्वे संघर्ष समितीच्यावतीने चंदुलाल बियाणी, प्रा सत्यनारायण दुबे, अश्विन मोगरकर यांनी स्वागत केले आहे.

नवीन वेळापत्रक असे असेलदर शुक्रवारी व रविवारी ही रेल्वे पुणे येथून रात्री १०.५० वाजता सुटेल व कुर्डवाडी, बार्शी, उस्मानाबाद, लातूर रोडमार्गे परळी वैजनाथ रेल्वे स्टेशनवर सकाळी ८ वाजता येईल. त्यानंतर आठ वाजून पंधरा मिनिटाला परळीहून प्रत्येक शनिवारी व सोमवारी ही गाडी अमरावतीकडे धावेल.  परभणी, पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम ,अकोला मार्गे अमरावतीला जाईल. तसेच अमरावती- पुणे ही रेल्वे गाडी प्रत्येक शनिवारी व सोमवारी सुटेल व परळी येथे रविवारी व मंगळवारी सकाळी 5.30 वाजता येईल. ही रेल्वे लातूर रोड मार्गे पुण्याकडे जाईल व रात्री पुणे येथे पोहचेल. 

कोविड काळात बंद असलेल्या सर्व गाड्या परळी मार्गे पूर्वीप्रमाणे धावत आहेत. परळी -मिरज ही गाडी काही महिन्यांपूर्वी सुरू झाली आहे. आता अमरावती- पुणे, पुणे -अमरावती रेल्वे गाडी आठवड्यातील २ दिवस पूर्वीप्रमाणे सुरू करण्यात आली आहे. - संतोष चिगळे, रेल्वे वाणिज्य अधिकारी परळी

रेल्वे प्रशासनाने पूर्वी प्रमाणे गाड्या सुरु करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. या गाडीत वातानुकूलित, स्लीपर कोच व जनरल कोच असेल.- सत्यनारायण दुबे, परळी रेल्वे संघर्ष समिती

ट्रॅव्हल्सचे वाढलेले भाडे, एसटीच्या खडतर प्रवासापेक्षा पुण्याला जाण्यासाठी रेल्वेचा आरामदायक व स्वस्त प्रवास यामुळे होईल.- आश्विन मोगरकर, रेल्वे प्रवाशी परळी

टॅग्स :railwayरेल्वेBeedबीड