शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानीची माहिती ऑफलाईन द्या; अस्मानी संकटानंतर शेतकरी पीकविमा कंपनीच्या नियमामुळे त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 19:13 IST

नुकसानीची ऑफलाईन माहिती देण्यासाठी कृषी कार्यालयात शेतकऱ्यांची गर्दी

ठळक मुद्दे पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांची अडवणूक शेतकरी संतप्त. 

दीपक नाईकवाडेकेज ( बीड ) : पीकविमा कंपनीने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची ऑफलाईन तक्रार दाखल केली तरच पाहणी करून विमा देण्याची भूमिका घेतली आहे. पीकविमा भरताना सर्व माहिती ऑनलाईन भरलेली असतानाही कंपनीने ऐनवेळी प्रतिनिधीकडे ऑफलाईन तक्रार दाखल करण्याचा जाचक नियम लावल्याची संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली. यामुळे आधीच अस्मानी संकटाने मोडलेला शेतकरी विमा कंपनीच्या  करावेलागत असल्याने त्रस्त झाला आहे. 

शेतात उभे असलेले पीक काढणीच्या वेळी केज तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकासह मातीही वाहून गेली आहे. नुकसानीची तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांना ऑफलाईन माहिती दिल्यानंतर नुकसानीची पाहणी करून विमा देण्याचा पवित्रा विमा कंपनीने घेतल्याने अस्मानी संकट कोसळल्याने कोसळलेल्या शेतकऱ्या समोर सावरण्यापूर्वीच सुलतानी संकट उभे राहिले आहे. शेतातील कामे सोडून शेतातील नुकसानीची माहिती ऑफ लाईन फॉर्म भरून विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडे देण्यासाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयात मोठी गर्दी केली. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी संतप्त होत विमा कंपनीला विमा द्यायचा नसल्याने अशा प्रकारे शेतकऱ्यावर सुड उगवत असल्याचा प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अस्मानी संकटामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला हातातील कामधंदा सोडून विमा कंपनीकडे नुकसानीची तक्रार करण्यासाठी रांगेत उभे राहून तक्रार द्यावी लागत आहे. 

विमा कंपनीकडे विमा भरताना सर्व माहिती दिलेली असतानाही पुन्हा माहिती मागून शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार विमा कंपनी करत आहेत. - लक्ष्मीकांत लाड, उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती

टॅग्स :BeedबीडCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी