बीड : राज्य सरकारमधील २२ मंत्र्यांचे ९० हजार कोटींचे घोटाळे मी जनतेसमोर सिध्द करुन दाखवतो. तुम्ही केलेले आरोप सिध्द करुन दाखवा. यासाठी समोरासमोर या असे आव्हान विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.राष्टÑवादी कॉँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचे बीडमध्ये रविवारी सायंकाळी आगमनानंतर सिध्दी विनायक संकुलावर सभेत वक्त्यांनी भाजप - शिवसेना सरकारवर टीका केली.धनंजय मुंडे पुढे म्हणाले, संदीपच्या बाबतीत जे घडत आहे ते माझ्याही बाबतीत घडले आहे. मात्र, मी आता पुढे गेलो आहे. संदीपला बळ देण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी जयंत पाटील म्हणाले, बीडमध्ये ज्यांना संधी दिली त्यांनी विकासाचे प्रश्न का सोडविले नाहीत ? असे म्हणत त्यांना पदे दिली, मात्र ते गेले कुठे तर रोजगार हमीवर ? अशी टीका करीत जयदत्त क्षीरसागरांवर कटाक्ष टाकला. एबीफॉर्म टाईप असता तर आजच संदीप क्षीरसागर यांना तो दिला असता, असेही पाटील म्हणाले. यावेळी बॅक वॉटर योजनेचा उल्लेख करत सलीम भार्इंसारखा जागता राहणारा आमदार पाहिल्याचे जयंत पाटील म्हणाले.संदीप क्षीरसागर यांच्या भाषणाचा धागा पकडत खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी जयदत्त क्षीरसागर यांच्यावर टीका केली. पद आणि सत्ता सगळं मिळालेले असताना विकास का करता आला नाही ? असा सवाल त्यांनी केला. मराठवाड्यात एका महिन्यात ४९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मुख्यमंत्री कोणत्या तोंडाने मराठवाड्यात जाणार असे ते म्हणाले. यावेळी संदीप क्षीरसागर यांनी नगरपालिका इंटरनॅशनल कारभार करीत असल्याची टीका केली. घरातले घाण पाणी बाहेर काढण्याऐवजी घाण पाणी घरात आहे. २० - २० दिवस पाणी मिळत नाही. त्यांचा वचननामा काय तर फाईव्ह स्टार एमआयडीसी, रेल्वे, कॉटन हब, बीडची अवस्था थ्री इडियटसारखी झाली आहे. ५० कोटी देऊन मंत्रीपद घेण्यापेक्षा हे पैसे मतदारसंघात खर्च केले असते तर बरे झाले असते असेही ते म्हणाले.सरकारच्या धोरणांमुळे नोक-या गेल्या, उद्योगधंदे मोडकळलेगेवराई : घोटाळे आणि चौकशी लागलेले लोक राष्ट्रवादी सोडून जात आहेत. पण छत्रपती शिवरायांचा विचार रक्तामध्ये असणारा एकही राष्ट्रवादीचा मावळा राष्ट्रवादी सोडून गेला नाही. त्यामुळे जे गेले त्यांच्यामुळे आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वच्छ झाल्याचे े प्रदेशाध्यक्ष आ. जयंत म्हणाले. शिवस्वराज्य यात्रेचे गेवराईत रविवार आगमन होताच विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली मोटार सायकल रॅली काढून स्वागत करण्यात आले. रॅलीनंतर जाहीर सभेच्या व्यासपीठावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,खा. अमोल कोल्हे,महिला प्रदेशाध्यक्ष रु पाली चाकणकर,माजी आ. अमरिसंह पंडित, प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी, यु. प्रदेशाध्यक्ष शेख महेबुब, राजन पाटील, राजेंद्र जगताप, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, उषा दराडे,रविंद्र क्षीरसागर, उमेश पाटील, भारती शेवाळे उपस्थित होते. आ. जयंत पाटील म्हणाले, देवेंद्र आणि नरेंद्र यांच्यामुळे आपले भवितव्य घडणार नाही तर बिघडणार आहे. शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ताकद दिली पाहिजे. येत्या विधानसभा निवडणुकीत विजयसिंह पंडित यांना बळ देण्याचे आवाहन त्यांनी केले. धनंजय मुंडे यांनी सत्ताधाऱ्यांची यात्रा ही महाधनादेश यात्रा असल्याची टीका केली. गल्ली ते दिल्ली सत्ता असतांना गेवराई विधानसभा मतदार संघात कोणता विकास झाला ? असा प्रश्न त्यांनी केला. खा. अमोल कोल्हे म्हणाले, सोळा हजार शेतक-यांच्या आत्महत्येप्रकरणी.सत्ताधाºयांवर ३०२ चा गुन्हा का दाखल करु नये ? असा सवाल त्यांनी केला. विजयसिंह पंडित म्हणाले, विद्यमान मुख्यमंत्र्यांनी गेवराईकरांना पिटीआर देण्याच्या आश्वासनाचे काय झाले? दिल्ली-मुबंईच्या गप्पा मारणाºयांनी दत्तक घेतलेल्या गेवराईकरांना वाºयावर सोडले. या फसव्या सरकारला जागा दाखवा, असे ते म्हणाले.पाटोद्यात खुर्च्या उलट्या धरुन श्रोत्यांनी भर पावसात ऐकली सभापाटोदा : रविवारी शिवस्वराज्य यात्रा पोहचल्यानंतर पाटोदा येथील सभेत खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी बोलायला सुरुवात केली आणि पाऊस सुरु झाला. समोरील श्रोत्यांनी डोक्यावर खुर्च्या उलट्या धरल्या आणि कोल्हे यांना बोलण्याचा आग्रह केला. भर पावसात खा. कोल्हे यांचे भाषण झाले. त्यांनी शरद पवारांचे कौतुक करताना ७९ वर्षांचा तरुण पूरग्रस्तांसाठी मदत कार्यात असतांना मुख्यमंत्री यात्रेत मागं होते अशी टीका केली. आ. धस यांच्यावर टीका करतांना कोल्हे म्हणाले, आष्टीवाल्याला ९ खात्याचा मंत्री केलं, महानंदचं अध्यक्षपद, त्यांच्या सांगण्यावरून मुस्लिमास जि. प. अध्यक्षपद असं खूप काही दिलं. मात्र, सत्तेची ऊब लागलेल्या या लोकांनी पक्षालाच अडचणीत आणलं. मात्र, जे गेले त्यांच्यासाठी रडायचं नाही आता लढायचं असे कोल्हे म्हणाले.जयंत पाटील यांनी भाजपाच्या कारभारावर घणाघाती टीका केली. नोटाबंदीमुळे सुशिक्षीत बेकार, व्यापारी, ग्राहक, शेतकरी, मजूर सर्व जनतेची फसवणूक झाली. वातावरण विरोधात असल्याचे लक्षात येताच बालाकोट, सर्जिकल स्ट्राईक सारखे उद्योग केले. शहीद जवानांच्या नावाने भावनिकता दाखवत मते मागितली आणि जनता पुन्हा बळी पडली. राज्य, केंद्राने केलेल्या चुकांचे पाप आता सामान्य जनतेला फेडावे लागत आहे. मंदीची मोठी लाट आली आहे. सहा लाख कारखाने बंद पडलेत कोट्यवधी लोकांच्या हातातले काम गेले. लाखो अभियंते बेकार झालेत. मजुरांना हाताला काम राहिले नाही. मनमोहनसिंग यांच्या काळात मंदी आली. मात्र त्यांनी अर्थव्यवस्थेला भक्कम कवचकुंडले दिल्याने त्याची झळ सामान्यांना बसली नसल्याचे ते म्हणाले.
मंत्र्यांचे घोटाळे सिध्द करतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 00:00 IST
राज्य सरकारमधील २२ मंत्र्यांचे ९० हजार कोटींचे घोटाळे मी जनतेसमोर सिध्द करुन दाखवतो. तुम्ही केलेले आरोप सिध्द करुन दाखवा. यासाठी समोरासमोर या असे आव्हान विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
मंत्र्यांचे घोटाळे सिध्द करतो
ठळक मुद्देधनंजय मुंडे : गेवराई, पाटोदा, बीडमध्ये शिवस्वराज्य यात्रेच्या सभा; भाजप-शिवसेनेवर नेत्यांची टीका