शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी आणि आयकर प्रणालीतील जाचक तरतुदींच्या विरोधात अंबाजोगाईत निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 19:13 IST

जीएसटी कायद्यात वारंवार होत असलेल्या बदलांमुळे वेळच्यावेळी त्याची माहिती होणे व आमलबजावणी करणे यात अडचणी निर्माण होत आहेत.

ठळक मुद्देकर सल्लागार आणि व्यापारी संघटना यांचा सहभाग

अंबाजोगाई : जीएसटी आणि आयकर प्रणालीतील जाचक तरतुदींमुळे हैराण झालेले  कर सल्लागार आणि व्यापारी यांनी दिनांक 29 जानेवारी 2021 शुक्रवारी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यानंतर आपल्या विविध मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर यांना दिले.

जीएसटी कायद्यात वारंवार होत असलेल्या बदलांमुळे वेळच्यावेळी त्याची माहिती होणे व आमलबजावणी करणे यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे जीएसटी कायद्याची सरळमार्गाने आणि सुटसुटीतपणे अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी कर सल्लागार आणि व्यापारी संघटनां यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष सीए विजय वालवडकर आणि सचिव पुरुषोत्तम रांदड यांनी दिली. साडेतीन वर्षापूर्वी देशात वस्तू व सेवाकर कायदा लागू करण्यात आला. संपूर्ण व्यवस्थेचे संगणकीकरण झाले, कराची आकडेवारी वाढली. खोटी बिले, हवाला पद्धत वापरून वर्षानुवर्षे सरकारचा कोट्यावधी रुपयांचा कर बुडविणारांवर अंकुश बसला. मात्र, जीएसटी कर प्रणालीच्या तरतुदीत सातत्याने बदल करण्यात येऊ लागले. निरनिराळे परिपत्रक काढणे, वेगवेगळे खुलासे करणे, कायद्याच्या व्याख्यांचा क्लिष्ट अर्थ लावणे, यामुळे व्यापारी आणि कर सल्लागार हवालदिल झाले आहेत. सरकार आणि करदात्यांमधील दुवा असणारे कर सल्लागारांवर देखील मागील तीन वर्षापासून कामाचा प्रचंड ताण आहे. सरकारची धोरणे आणि किचकट भाषेतील कायदे, नियम करदात्यांना समजावून सांगून कर वसुली वाढविण्यात त्यांचा मोठा हातभार आहे. परंतु, रोजच्या नवनवीन जाचक तरतुदींची पूर्तता करणे आता कर सल्लागारांच्याही सहनशक्तीच्या बाहेर गेले आहे. 

याबाबत वेळोवेळी सरकारकडे मागणी करूनही सरकार अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करत नाही. उलट, सातत्याने नवनवीन तरतुदींचा भडीमार करून समस्या अधिकच जटील करण्याचे काम जिएसटी कौन्सिल करत आहे. या सर्व अडचणींकडे केंद्र सरकार व जिएसटी कौन्सिलचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी देशव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून अंबाजोगाई शहरातील व्यापारी, कर सल्लागार व चार्टर्ड अकाउंटंस् दिवसभर काळ्या फिती लावून व अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन विरोध नोंदवणार आहेत होणार आहेत. शुक्रवारी सर्व कर सल्लागार  व चार्टर्ड अकाउंटस् या कायद्याच्या विरोधात काळ्या फिती लावून काम करण्यात आले असल्याची माहिती कर सल्लागार संघटनेचे अध्यक्ष  सीए विजय वालवडकर आणि सचिव पुरुषोत्तम रांदड यांनी दिली.  खा. प्रीतम मुंडे यांना दिले निवेदन दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अंबाजोगाई कर सल्लागार संघटनेच्या शिष्टमंडळाने खासदार मा.प्रीतम मुंडे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यांनी हा विषय अर्थमंत्री यांच्याकडे हा विषय मांडण्याचे अश्वासन दिले.

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सGSTजीएसटीagitationआंदोलन