शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

परळी तहसीलसमोर मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 19:33 IST

आज मोर्चाच्या दुसऱ्या दिवशीही तहसील कार्यालयासमोर आंदोलकांचे ठिय्या आंदोलन सुरूच होते.  

परळी (बीड ) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, मेगा भरती रद्द व्हावी यासह अन्य मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतिने बुधवारी परळी तहसील कार्यालयावर ठोक मोर्चा काढून ठिय्या आंदोलनाचे हत्यार उपसले. आज मोर्चाच्या दुसऱ्या दिवशीही तहसील कार्यालयासमोर आंदोलकांचे ठिय्या आंदोलन सुरूच होते.  

बुधवारी मराठा क्रांती मोर्चाचा परळी तहसील कार्यालयावर ठोक मोर्चा धडकल्याने व रात्रभर ठिय्या आंदोलन केल्याने राज्यभर याचे पडसाद उमटणे सुरू आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा बुधवारी विधान परिषदेतही विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मांडला. तसेच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी नोकरभरतीत 16 टक्के आरक्षण मराठा समाजाला असल्याचे घोषित केले. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतरही आंदोलक समाधानी झाले नाहीत. यामुळे सायंकाळी परळी तहसीलसमोर ठिय्या आंदोलन सुरूच होते. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनास गुरूवारी बीड, अंबाजोगाई, परळी, परभणी येथील विविध पक्षाच्या नेत्यांनी भेट देवून पाठींबा जाहीर केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर आमचा विश्वास नाही असे मराठा क्रांती मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत परळी तहसीलसमोर मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन चालूच राहील असेही पाटील यांनी 'लोकमत' शी बोलतांना सांगितले.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाagitationआंदोलनState Governmentराज्य सरकारreservationआरक्षण