शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

देहाचे रक्षण जनकल्याणासाठी करा- शंकराचार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 23:57 IST

जनकल्याणाचे तत्व आणि धर्म कार्य करण्यासाठी या देहाचे रक्षण करा तरच आनंद, सुख व समाधान प्राप्त होईल, असा उपदेश दक्षिणाम्नाय शारदापीठ श्रृंगेरी पीठ (कर्नाटक) जगद्गुरू शंकराचार्य श्रीविधुशेखर भारती स्वामीजी यांनी बीड येथे रविवारी गुरुवंदना कार्यक्रमप्रसंगी दिला.

बीड : प्रत्येक मनुष्य जगण्यासाठी शिक्षण घेतो, नौकरी करतो, पैसा कमावतो आणि उदरनिर्वाह करीत सुख उपभोगतो. हे सर्व करण्यासाठी देह हे सर्वात महत्त्वाचे माध्यम आहे. त्या देहाचे रक्षण आपण करतो. पण हे पुरेसे आहे आहे का? असा प्रश्न उपस्थित करत केवळ सुख उपभोगण्यासाठी देहाचे रक्षण पुरेसे नाहीतर जनकल्याणाचे तत्व आणि धर्म कार्य करण्यासाठी या देहाचे रक्षण करा तरच आनंद, सुख व समाधान प्राप्त होईल, असा उपदेश दक्षिणाम्नाय शारदापीठ श्रृंगेरी पीठ (कर्नाटक) जगद्गुरू शंकराचार्य श्रीविधुशेखर भारती स्वामीजी यांनी बीड येथे रविवारी गुरुवंदना कार्यक्रमप्रसंगी दिला.यावेळी श्रीविधुशेखर भारती स्वामीजी म्हणाले, मानवाचे शरीर हे उसासारखे आहे. साखरेची मधूर चव आपल्यापर्यंत पोहचण्यासाठी उसाला चरकातून जावं लागतं, रस काढावा लागतो त्यासाठी त्याला अनंत कष्ट भोगावे लागतात तेव्हा आपल्या साखरेची मधूर चव चाखायला मिळते. त्याचप्रमाणे शरीराला देखील कष्ट देऊन धर्मकार्य, पुण्यकर्म करण्याचे अनुष्ठान करण्यासाठी आपली शक्ती आणि सामर्थ्य असले पाहिजे, असे ते म्हणाले. वय झाल्यानंतर नव्हेतर शरीर स्वस्थ असताना धर्मसाधना करा, चांगले तत्व, विचाराने ज्ञान प्राप्त करा तरच आपले अज्ञान दूर होईल. देहाची शक्ती कमी झाल्यावर धर्मकार्य करून काही उपयोग होणार, नाही असा संदेश त्यांनी युवा पिढीला दिला. हे माझे, ते माझे असे मनुष्य म्हणत असतो पण हे सत्य नसून शाश्वत केवळ परमात्मा असल्याचे ते म्हणाले.प्रारंभ संयोजन समितीचे अ‍ॅड. कालिदास थिगळे, वे.शा.सं.धुंडीराज शास्त्री पाटांगणकर, ह.भ.प.भरतबुवा रामदासी, वे.शा.सं. अमोलशास्त्री जोशी, डॉ. दिलीपराव देशमुख, सतीश पत्की, दिलीप खिस्ती, दुर्गादास गुरुजोशी, एकनाथ महाराज पुजारी, प्रमोद पुसरेकर, संजय गुळजकर, विनायक पटांगणकर, वाय. जनार्दन राव यांच्या हस्ते स्वामीजींचे स्वागत ऋणपत्र देऊन करण्यात आले.यशस्वीतेसाठी अनिल कुलकर्णी, दीपक कुलकर्णी, अक्षय भालेराव, विष्णुदास बियाणी, सचिन कुलकर्णी, दीपक सर्वज्ञ, बाळासाहेब रुईकर, उदय जोशी, अलोक कुलकर्णी, प्रशांत आंबेकर, प्रसाद राजेंद्र, सौरभ जोशी, ओंकार पाठक, रोहित कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व वेद मंत्रपठण अनंतशास्त्री मुळे, सूर्यकांत मुळे, गोविंद महाराज जाटदेवलेकर, दुर्गादास जोशी यांनी केले तर आभार दिलीप खिस्ती यांनी मानले. कार्यक्रमात बहुसंख्येने नागरिक सहभागी झाले होते.

टॅग्स :BeedबीडReligious programmeधार्मिक कार्यक्रम