शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

प्रीतम मुंडे यांनी केली शेतातील पिकांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 23:44 IST

बीड : परतीच्या पावसाने महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यात तीन आठवड्यासापूसन थैमान घातले आहे. तीन वर्षांपासून दुष्काळात होरपळणाºया शेतक-यांचा पाण्याचा प्रश्न ...

ठळक मुद्देनुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान पोहोचेल : शेतकऱ्यांनी काळजी करु नये

बीड : परतीच्या पावसाने महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यात तीन आठवड्यासापूसन थैमान घातले आहे. तीन वर्षांपासून दुष्काळात होरपळणाºया शेतक-यांचा पाण्याचा प्रश्न मिटला असला तरी, अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम हातचा गेला आहे. कापूस, सोयाबीन, मका, बाजरी या पिकांचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीत लोकप्रतिनिधी व शासन शेतकºयांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. विमा कंपनीच्या सर्व जाचक अटी व नियमांची कोणतीही काळजी नये. नुकसानग्रस्त प्रत्येक शेतक-याच्या खात्यावर शासनाचे अनुदान जमा पोहचेल, असे मत खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केले.जिल्ह्यातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी खा.मुंडे यांनी केली. बीड तालुक्यातील पेंडगाव, माळापुरी, औरंगपूर, भाटसांगवी, वाकनाथपूर, उंब्रज खालसा, नागपूर, इट, पिंपळनेर, ताडसोन्ना या गावांचा दौरा त्यांनी दौरा केला. यावेळी आ. लक्ष्मण पवार, भाजपा युवा राजेंद्र मस्के यांची देखील उपस्थिती होती.राजेंद्र मस्के यांनी यांनी देखील शेतक-यांशी संवाद साधला. शेतकºयांना धीर देत विमा असो अथवा नसो प्रत्येक शेतकºयांला नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासनाकडे मागणी केल्याचे सांगितले. नुकसानग्रस्त शेतक-यांना अनुदान मिळवून देण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी प्रयत्नशील आहेत. दुष्काळात तीन वर्षांपासून पिचलेल्या शेतकरी वर्गाचा आर्थिक कणा खरीप हंगाम गेल्याने नेस्तनाबूत झाला आहे. पावसाच्या आगमनाने शेतकरी वर्ग सुखावला होता परंतु अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. कर्जाच्या ओझ्यातही नवी भर पडल्याने शेतकरी शेतमजूर त्रस्त झाला आहे. अशा अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना सरसकट कर्जमाफी दिली तर ती नवसंजीवनी ठरेल अशी आशा राजेंद्र मस्के यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी हा मुद्दा लोकसभेत उपस्थित करावा आणि शेतकºयांना अनुदान लवकरात लवकर मिळवून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.मुंडे यांनी बैलगाडीतून केली पाहणीपिकांची पाहणी करण्यासाठी एका नदीतून बैलगाडीच्या सहाय्याने डॉ.प्रीतम मुंडे यांनी प्रवास केला. व नदी ओलांडून वाकनाथपूर येथील शेतक-यांशी संवाद साधल्याने येथील ग्रामस्थांना दिलासा मिळाला. तसेच अनेकांनी खा. मुंडे यांच्यापुढे त्यांचे प्रश्न मांडले. यावेळी त्यांनी देखील मोकळेपणाने या सर्व प्रश्नांचे निराकारण केले. तसेच शासनाला परिस्थितीची जाणीव असून सर्वांना नुकसानभरपाई मिळेल असे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले.

टॅग्स :BeedबीडPritam Mundeप्रीतम मुंडेRainपाऊस