शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत लॉजिंगच्या आडून चालणाऱ्या कुंटणखान्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 00:30 IST

येथील साठे चौकातील न्यू संतोष लॉजवर बीड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या पथकाने शुक्रवारी टाकलेल्या छाप्यात तीन महिलांची सुटका करण्यात आली. लॉज मालक, व्यवस्थापक, आंटी आणि तीन ग्राहकांवर गुन्हा नोंदविण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : येथील साठे चौकातील न्यू संतोष लॉजवर बीड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या पथकाने शुक्रवारी टाकलेल्या छाप्यात तीन महिलांची सुटका करण्यात आली. लॉज मालक, व्यवस्थापक, आंटी आणि तीन ग्राहकांवर गुन्हा नोंदविण्यात आला.अंबाजोगाई येथील अण्णाभाऊ साठे चौकात आश्रुबा भाऊराव सारूक यांच्या मालकीचा न्यू संतोष लॉज आहे. या ठिकाणी लॉजमालक सारूक, लॉज व्यवस्थापक दत्तात्रय रामभाऊ मुंडे आणि आंटी अनिता रमेश जगताप हे तिघेजण संगनमताने महिलांना आर्थिक आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेला प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे शुक्रवारी अंबाजोगाई गाठून लॉज परिसरात सापळा रचला. खबºयाकडून इशारा मिळताच पोलिसांनी लॉजवर छापा मारला. पोलिसांची चाहूल लागताच लॉज मालक आश्रुबा सारूक पसार झाला. पोलिसांनी लॉजची झडती घेतली असता वेगवेगळ्या तीन खोल्यातून हनुमान मदनराव सोनवणे (वय २८, रा. लोणी, ता. परळी), सिद्धेश्वर जालिंदर पाडुळे (वय २४, रा. दगडवाडी, ता. अंबाजोगाई) आणि फिरोज मुसा दंडीये (रा. बर्दापूर, ता. अंबाजोगाई) या तीन ग्राहकांना तीन महिलांसोबत रंगेहाथ पकडले. पीडित महिलांची सुटका करत पोलिसांनी तिन्ही ग्राहक आणि लॉज व्यवस्थापक दत्तात्रय रामभाऊ मुंडे याला ताब्यात घेतले. आंटी अनिता रमेश जगताप हिला बस स्थानक परिसरातून अटक करण्यात आली. याप्रकरणी सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी भारती यांच्या फिर्यादीवरून आश्रुबा सारूक, आंटी अनिता जगताप, व्यवस्थापक दत्तात्रय मुंडे आणि तिन्ही ग्राहकांवर अंबाजोगाई शहर पोलिसात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला.ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक अजित बोºहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक रोशन पंडित, फौजदार भारत माने, महिला पोलीस सिंधू उगले, मीना घोडके, पोलीस कर्मचारी सतीश बहिरवाळ, शेख शमिम पाशा, मिसाळ, कदम यांनी पार पाडली.

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीसCrime Newsगुन्हेगारी