माजलगाव : माजलगाव शहर पोलिसांनी गुरुवारी पहाटे चार ठिकाणी गावठी दारू अड्डयांवर धाडी टाकल्या. यामध्ये ३३ हजार रुपयाची गावठी दारू व रसायनासह चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.शहरातील भीम नगरमध्ये दोन ठिकाणी, इंदिरानगर व नगरपालिकाजवळ असलेल्या गावठी दारू अड्डयांवर पोलिसांनी छापे मारले. यामध्ये दारू जप्त करून रसायन नष्ट करण्यात आले. यामध्ये चौघांना ताब्यात घेतले. सफौ. एस.बी.शेटे यांच्या फिर्यादीवरून सुनील मेंडके, पारूबाई गंगाधर मेंडके, मोहन मेंडके, रूक्मिन सुमंतराव मेंडके यांच्याविरुद्ध माजलगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान, पोलीस उपनिरीक्षक एस.एस. बिराजदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस.बी. शेटे, पोना डी.के. सरवदे, पोकॉ पी.सी.बेले, ज्योती कापले आदींनी केली.
गावठी दारू अड्ड्यांवर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 23:47 IST
माजलगाव शहर पोलिसांनी गुरुवारी पहाटे चार ठिकाणी गावठी दारू अड्डयांवर धाडी टाकल्या. यामध्ये ३३ हजार रुपयाची गावठी दारू व रसायनासह चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गावठी दारू अड्ड्यांवर छापा
ठळक मुद्देचौघांविरुद्ध गुन्हा दाखल : माजलगाव पोलिसांची कामगिरी