शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावात सभापती पुत्राचा राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 01:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : येथील नगर परिषदेच्या नियोजन व विकास सभापती हनिफाबी शेख बशीर यांचा मुलगा शेख इम्रान याने त्याच्या खाजगी पोल्ट्रीफार्मवर एलईडी लाईट का लावत नाहीस म्हणत नगराध्यक्षांच्या दालनात उपस्थित नगरसेवकांसमोरच विद्युत अभियंता शतानिक जोशी यांना खुर्चीने मारहाण केली. ही घटना शुक्रवारी दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान घडली.शुक्रवारी दुपारी येथील ...

ठळक मुद्देनगराध्यक्षांच्या दालनात विद्युत अभियंत्याच्या डोक्यात घातली खुर्ची

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : येथील नगर परिषदेच्या नियोजन व विकास सभापती हनिफाबी शेख बशीर यांचा मुलगा शेख इम्रान याने त्याच्या खाजगी पोल्ट्रीफार्मवर एलईडी लाईट का लावत नाहीस म्हणत नगराध्यक्षांच्या दालनात उपस्थित नगरसेवकांसमोरच विद्युत अभियंता शतानिक जोशी यांना खुर्चीने मारहाण केली. ही घटना शुक्रवारी दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान घडली.

शुक्रवारी दुपारी येथील नगराध्यक्षांच्या दालनात नगराध्यक्षांसह आठ ते दहा नगरसेवक बसलेले होते. या वेळी नियोजन व विकास सभापती हनिफाबी शेख बशीर यांचा मुलगा शेख इम्रान याने विद्युत अभियंता जोशी यांना तेथे बोलावून घेतले. शहरालगत असलेल्या माझ्या पोल्ट्रीफार्मवर तू एलईडी लाईट का लावत नाहीस म्हणत अध्यक्षांसमोरच हुज्जत घालण्यास सुरुवात केली. यावर संबंधित अभियंत्याने मला असे करता येणार नाही असे उत्तर दिल्यावर या सभापती पुत्राचा पारा चढला. त्याने बाजूला असलेली खुर्ची उचलून अभियंता जोशी यांच्या डोक्यात घातली. गचुरे धरुन शिवीगाळ करत कपडे फाडण्याचा प्रयत्न केला. प्रकार वाढत असल्याचे पाहून काही नगरसेवकांनी यात हस्तक्षेप करुन सोडवासोडव केली.

घटना घडल्यानंतर न.प. कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरु केले. ते पोलीस ठाण्यात गेले. त्यांच्या पाठोपाठच नगराध्यक्ष सहाल चाउस व आठ ते दहा नगरसेवकही पोलीस ठाण्यात आले. अखेर नोकरी करायची आहे या भितीपोटी कर्मचा-यांनी माघार घेवून परतीचा रस्ता धरला.आॅनलाईन तक्रार केलीनगर परिषदेत आमच्या कर्मचा-यास मारहाण केल्यानंतर आम्ही पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेलो. तेथे पदाधिकारी व नगराध्यक्षांनी तेथे येऊन सदर कर्मचारी व आमच्यावर दबाव आणला. आम्ही आॅनलाईन तक्रार केली असून, सोमवारपासून कामबंद आंदोलन करणार आहोत.- शिवहर शेटे, अध्यक्ष, न.प. कर्मचारी संघटना.

प्रकार घडला, मध्यस्थी केलीसदरील प्रकार हा माझ्यासमोरच झाला. त्यावेळी संबंधित सभापती पुत्रास आवरले. तसेच पदाधिकारी व कर्मचारी यांच्यात वितुष्ठ निर्माण होवू नये म्हणून आम्ही मध्यस्थी करुन कर्मचा-यांना तक्रार देण्यापासून परावृत्त केले.- सहाल चाउस, अध्यक्ष, नगर परिषद, माजलगाव

टॅग्स :BeedबीडPoliticsराजकारणMarathwadaमराठवाडाPoliceपोलिस