शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

विकासासाठी कोणाचीही पायरी चढायला तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 23:50 IST

नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यासाठी ६ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड दौ-यावर येत आहेत.

ठळक मुद्देभारतभूषण क्षीरसागर : होणाऱ्या चर्चेला अर्थ नाही, बीडसाठी मुख्यमंत्र्यांनी भरीव निधी दिला

बीड : नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यासाठी ६ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड दौ-यावर येत आहेत. विरोधीपक्षात असलो तरी शहरात विकास कामे होण्यासाठी कोणाचीही पायरी चढायला आपण तयार असून होणाºया चर्चा निरर्थक असल्याचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या दौºयाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आ. जयदत्त क्षीरसागर उपस्थित होते.६ फेब्रुवारी रोजी बीड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १६८ कोटी रुपयांची अमृत भूमिगत गटार योजना, ८८ कोटींच्या १६ डीपी रोडचा शुभारंभ, निवारागृह, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गंत ४४८ घरांची निर्मिती, न. प. सभागृहाचे स्व. गोपीनाथराव मुंडे नामकरण, जिल्हा रुग्णालयातील १०० खाटांचे शिशू व महिला विभागाची निर्मिती आदी कामांचा शुभारंभ व लोकार्पण होणार आहे. यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे, आ.सुरेश धस, सतीश चव्हाण, विक्रम काळे, आर.टी. देखमुख, भीमराव धोंडे, संगीता ठोंबरे, लक्ष्मण पवार हे उपस्थित राहणार असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर यांनी दिली.यावेळी आ. जयदत्त क्षीरसागर म्हणाले, शहरात या योजनेसह इतर ४०० कोटींची विकासकामे होणार आहेत. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत ठोस उपाययोजनांची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.राष्ट्रवादीची नगरपरिषद असताना मुख्यमंत्र्यांना निमंत्रण तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो बॅनरवर नाहीत या प्रश्नाला उत्तर देताना हा कार्यक्रम राजकीय नाही. नगर परिषद ही शहरातील नागरिकांची संस्था आहे. प्रोटोकॉलप्रमाणे बोलावलेल्या पाहूण्यांचे स्वागत करणे आपले कर्तव्य आहे. जेव्हा पक्षाचा कार्यक्रम असतो त्यावेळी आम्ही इतर नेत्यांचे फोटो टाकतो, असे ते म्हणाले. शहराच्या विकासासाठी आमच्या पाठपुराव्यामुळे मंजुरी व भरीव निधी देण्याचे काम मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना बोलावल्याचे नगराध्यक्ष यावेळी म्हणाले.यांचा होणार सत्कारपद्श्री डॉ.वामन केंद्रे व पद्मश्री शाब्बीर शेख तसेच कुस्तीपटू राहुल आवारे, क्रिकेटपटू सचिन धस यांचा नगरपरिषद, मुख्यमंत्री व इतर मान्यवरांच्या हस्ते स्वागत केले जाणार आहे.

विकासासाठी कोणाचीही पायरी चढायला तयारभारतभूषण क्षीरसागर : होणाऱ्या चर्चेला अर्थ नाही, बीडसाठी मुख्यमंत्र्यांनी भरीव निधी दिलालोकमत न्यूज नेटवर्कबीड : नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यासाठी ६ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड दौºयावर येत आहेत. विरोधीपक्षात असलो तरी शहरात विकास कामे होण्यासाठी कोणाचीही पायरी चढायला आपण तयार असून होणाºया चर्चा निरर्थक असल्याचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या दौºयाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आ. जयदत्त क्षीरसागर उपस्थित होते.६ फेब्रुवारी रोजी बीड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १६८ कोटी रुपयांची अमृत भूमिगत गटार योजना, ८८ कोटींच्या १६ डीपी रोडचा शुभारंभ, निवारागृह, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गंत ४४८ घरांची निर्मिती, न. प. सभागृहाचे स्व. गोपीनाथराव मुंडे नामकरण, जिल्हा रुग्णालयातील १०० खाटांचे शिशू व महिला विभागाची निर्मिती आदी कामांचा शुभारंभ व लोकार्पण होणार आहे. यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे, आ.सुरेश धस, सतीश चव्हाण, विक्रम काळे, आर.टी. देखमुख, भीमराव धोंडे, संगीता ठोंबरे, लक्ष्मण पवार हे उपस्थित राहणार असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर यांनी दिली.यावेळी आ. जयदत्त क्षीरसागर म्हणाले, शहरात या योजनेसह इतर ४०० कोटींची विकासकामे होणार आहेत. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत ठोस उपाययोजनांची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.राष्ट्रवादीची नगरपरिषद असताना मुख्यमंत्र्यांना निमंत्रण तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो बॅनरवर नाहीत या प्रश्नाला उत्तर देताना हा कार्यक्रम राजकीय नाही. नगर परिषद ही शहरातील नागरिकांची संस्था आहे. प्रोटोकॉलप्रमाणे बोलावलेल्या पाहूण्यांचे स्वागत करणे आपले कर्तव्य आहे. जेव्हा पक्षाचा कार्यक्रम असतो त्यावेळी आम्ही इतर नेत्यांचे फोटो टाकतो, असे ते म्हणाले. शहराच्या विकासासाठी आमच्या पाठपुराव्यामुळे मंजुरी व भरीव निधी देण्याचे काम मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना बोलावल्याचे नगराध्यक्ष यावेळी म्हणाले.यांचा होणार सत्कारपद्श्री डॉ.वामन केंद्रे व पद्मश्री शाब्बीर शेख तसेच कुस्तीपटू राहुल आवारे, क्रिकेटपटू सचिन धस यांचा नगरपरिषद, मुख्यमंत्री व इतर मान्यवरांच्या हस्ते स्वागत केले जाणार आहे.

टॅग्स :BeedबीडJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरChief Ministerमुख्यमंत्री