शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

सुरांच्या हिंदोळ्यांवर शब्दब्रह्माची अनुभूती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 23:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क स्वामी रामानंद तीर्थनगरी (अंबाजोगाई) : मायमराठीच्या साडेसहाशे वर्षांच्या प्रवासासाठी प्रमुख टप्प्या-टप्प्यांवरील माईल स्टोन ठरलेल्या प्रतिभावंतांच्या गेय ...

ठळक मुद्देमराठी सारस्वतांना मानाचा मुजरा

लोकमत न्यूज नेटवर्कस्वामी रामानंद तीर्थनगरी (अंबाजोगाई) : मायमराठीच्या साडेसहाशे वर्षांच्या प्रवासासाठी प्रमुख टप्प्या-टप्प्यांवरील माईल स्टोन ठरलेल्या प्रतिभावंतांच्या गेय रचनांची नितांत सुंदर मैफल अंबाजोगाई साहित्य संमेलनात रंगली. डॉ. राजेश सरकटे व त्यांच्या चमूने जणू मराठी सारस्वतांंना घातलेला हा मानाचा मुजराच होता.विख्यात विदूषी महदंबा यांच्या कृष्णभक्तिपर काव्याने प्रवासाचा श्रीगणेशा झाला. संत नामदेव, संत जनाई यांच्या काव्यातील भक्तिरसात रसिक चिंब झाले.ख्रिसमसने आणलेली गुलाबी थंडी शब्दांची धग आणि त्यावर चढवलेला स्वरांचा मुलामा यामुळे रसिक श्रोते उल्हासित झालेले होते. आधुनिक मराठीच्या टप्प्यावरील कवींच्या शब्दांची पूजा बांधताना डॉ. सुहासिनी इर्लेकरांच्या शब्दकळांशी सुरावटीचा मेळ बसलाडोळ्यात रंग ओले, डोळे अभंग कोठे?मी आज गात आहे, गाणे तुझ्यासाठीनभकाजळी तमाने येते भरून जेव्हाहोते हताश माती, जाते तुटून तेव्हाउजळीत लोचने ये लावुनी प्रेमज्योतया काव्यातून स्त्रीत्वाच्या सुलभ भावना उमलू लागल्या.त्यानंतर कवी वा.रा.कांत यांचीदूर टिटवीची साद,वाºयावरी भरे काटाहोते पोळणी मनाची,हुरड्यास येई लाटातुझ्या गुंफल्या बोटांचे,सळ उठले वाºयातगीत माझे थरकतेओल्या रीतीच्या ओठातडॉ. वैशाली देशमुख यांचा कवितेला लाभलेला स्वर आडरानात टिटवीच्या कलरवाची आठव करून गेला. डॉ. शैला लोहिया यांच्याचांदण्याचा पूर आतालागला रे ओसरूदूर होई साजना, वस्त्र दे मज आवरूया शृंगार रसातील काव्याला डॉ. देशमुख तेवढ्याच नजाकतीने पेश केले. फ.मुं. शिंदे यांच्या‘गळाली पाने उदास राने,सुख-दु:खाचे येणे-जाणे’या शब्दरचनेने काहीशी स्तब्धता निर्माण केली. कविवर्य ना.धों. महानोरांच्या‘झाडं झाली हिरवीशी,शीळ घुमते रानातओळ जांभळ्या मेघांचीवाहे नदीच्या पानात’या रचनेला गंगेच्या पाण्याइतका पारदर्शी सूर गवसला होता.मायमराठीचे चलचित्र एकामागून एक समोर येत होती. अनुराधा पाटील यांच्या,‘भल्या पहाटे पहाटे,पाय नदीच्या पाण्यातउठे नदीपार नाद, दाटे उमाळा मनात’स्त्रीच्या अंतर्मनातील हुरहूर डॉ. वैशाली देशमुख यांच्या सुरातून जशीच्या तशी साकारली. ना.गो. नांदापूरकरांची ‘माझी मराठी असे मायभाषा’ ही अजरामर कविता डॉ. राजेश सरकटे बेभान होऊन गात होते.तोडा चिरा दुग्धधाराच येतीन हे रक्त वाहे शरीरातुनीमाझी मराठी, मराठाच मी ही असे शब्द येतीलही त्यातुनीया ओळींना गायकाचा टिपेला पोहोचलेला सूर अवर्णनीय होता. कविवर्य बी. रघुनाथांचीचंदनाच्या विठोबाचीमाय गावा गेली,पंढरी या ओसरीची आज ओस झाली’कवीची काहीशी उदासवाणी भावना यमन रागात डॉ. वैशाली देशमुख यांनी अधिकच खुलविली, तर त्यांचीच लावणीवजा रचना‘कुरवाळुनी करिशी मनधरणी,चेटक्या तुझी कळली करणी’गायिका संगीता भावसार यांनी तेवढ्याच ठसक्यात सादर केली. कवी इंद्रजित भालेरावांची ‘माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता’ रचना डॉ. सरकटे यांनी लोकसंगीताच्या बाजात प्रस्तुत केली. दासू वैद्य यांचीजगण्याचा पाया । चालण्याचे बळ।विचाराची कळ । तुकाराम ।।ही रचना सादर झाली.मराठी माणसाच्या मर्मबंधाची ठेव ठरलेल्या कविता संगीतबद्ध करून डॉ. राजेश सरकटे यांनी एका अर्थाने मायमराठीचा हा ऋणनिर्देशच केला, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये. हल्लीच्या आॅर्केस्ट्राच्या जमान्यात मंचावरून वाद्यांची अनुभूती तशी बंदच झाली आहे; परंतु या संचाने सतार, बासरीचा लाईव्ह वापर करून एक सुखद अनुभव दिला. सहकलावंत उमाकांत शुक्ला (सतार), प्रथमेश साळुंके (बासरी), प्रा. जगदीश व्यवहारे (तबला), अंकुश बोरडे (ढोलकी), राजेश भावसार (आॅक्टोपॅड), राजेश देहाडे (सिंथेसायझर), संकेत देहाडे (गिटार) यांनी साथसंगत केली. शब्दसुरांच्या या प्रवासाचे सारथ्य म्हणजे निवेदन ही बाजू समाधान इंगळे यांनी सांभाळली. एकूणच संगीत संयोजन विनोद सरकटे यांचे होते.रात्रीच्या मैफलीस खुद्द संमेलनाध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी, स्वागताध्यक्ष राजेसाहेब देशमुख, संयोजन समितीचे पदाधिकारी व अंबानगरीतील रसिक श्रोते, साहित्यिक केवळ उपस्थितच होते असे नाही, तर उत्स्फूर्तपणे दादही देत होते, हे विशेष!

टॅग्स :Marathwada Sahitya Sammelanमराठवाडा साहित्य संमेलन