शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाश सोळंकेंनी गड राखला; चुरशीच्या लढतीत शरद पवार गटाच्या मोहन जगतापांचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 16:48 IST

विशेष म्हणजे, पहिल्या फेरीपासून पंधराव्या फेरीपर्यंत मोहन जगताप आघाडीवर होते.

माजलगाव: राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी चुरसीच्या लढतीत आपला गड राखला आहे. त्यांनी शरद पवार राष्ट्रवादीचे उमेदवार मोहन जगताप यांचा ५ हजार ८७१ मताने पराभव केला. विशेष म्हणजे, पहिल्या फेरीपासून पंधराव्या फेरीपर्यंत मोहन जगताप आघाडीवर होते. त्यानंतर १६ व्या फेरीपासून अखेरच्या २९ व्या फेरीपर्यंत सलग आघाडी घेत प्रकाश सोळंके यांनी हा विजय प्राप्त केला.

पुतण्याला उमेदवारी द्यावी मी लढणार नाही असे जाहीर केल्यानंतर ही पक्षाने प्रकाश सोळंके यांनाच उमेदवारी दिली. तर त्यांच्या विरोधात शरद पवार गटाने भाजपातून आलेल्या मोहन जगताप यांना उमेदवारी दिली. या सोळंके आणि जगताप अशी थेट लढत होत असताना अपक्ष रमेश आडसकर, माधव निर्मळ आणि बाबरी मुंडे यांनी देखील चुरस वाढवली. अपक्ष उमेदवार किती मते घेतात यावर सोळंके आणि जगताप यांच्या विजयाचे चित्र अवलंबून होते अशी शक्यता मतमोजणी आधी वर्तविण्यात आली. मात्र, शेवटी सोळंके आणि जगताप या दोघांतच शेवटच्या फेरीपर्यंत लढत झाली. पहिल्या फेरीपासून पंधराव्या फेरीपर्यंत मोहन जगताप आघाडीवर होते. त्यानंतर १६ व्या फेरीपासून अखेरच्या २९ व्या फेरीपर्यंत सलग आघाडी घेत प्रकाश सोळंके यांनी विजय मिळवला. तर त्यांच्या विरोधात मागील निवडणूक भाजपाकडून लढलेले अपक्ष उमेदवार रमेश आडसकर हे तिसऱ्या स्थानी राहिले. 

अशी मिळाली मते : प्रकाश सोळंके - 66 हजार 211मोहण जगताप -61 हजार 007बाबरी मुंडे -17 हजार 395माधव निर्मळ -33 हजार 799रमेश आडसकर -37 हजार 168

अनेक अडथळे पार करत मिळवला विजयमागील विधानसभा निवडणुकीत भाजपचे रमेश आडसकर यांच्या उमेदवारीमुळे विजय मिळवणे जड जात होते. त्यामुळे प्रकाश सोळंके यांनी मतदारसंघात प्रत्येक सभेदरम्यान ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे सांगत निवडून देण्याचे भावनिक आवाहन केले होते. यामुळे सोळंके यांना सहानुभूती मिळाली होती. तरीही नवखे रमेश आडसकर यांनी चांगली लढत दिली. केवळ ११ हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. पराभवानंतरही गत पाच वर्षांत एकही दिवस मतदारसंघ सोडला नाही व कायम जनतेच्या संपर्कात राहिले. मात्र, अजित पवार राष्ट्रवादीने भाजपसोबत महायुतीमध्ये प्रवेश केल्याने आडसकर यांचा पत्ता कट झाला. यामुळे आडसकर यांनी ऐनवेळी भाजपा सोडून शरद पवार गटात प्रवेश केला. मात्र, त्यांना तिकीट नाकारून शरद पवार गटाने भाजपमधून आलेलेचे मोहन जगताप यांना उमेदवारी दिली. त्यामुळे आडसकर यांनी बंडखोरी केली. दुसरीकडे अजित पवार गटाचे माधव निर्मळ, भाजपचे बाबरी मुंडे यांनी देखील बंडखोरी केली. यातच वंचितने मुस्लिम उमेदवार दिल्याने निवडणुकीत चुरस वाढली होती.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकmajalgaon-acमाजलगांवPrakash Solankeप्रकाश सोळंके