शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वीजचोरी घरोघरी; दिसली फक्त ५५ दारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 00:18 IST

मागील दोन वर्षात केवळ ५५ ठिकाणी वीज चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड शहरासह जिल्ह्यात सध्या सर्वत्र सर्रास वीज चोरी केली जात आहे. महावितरणला मात्र, कोठेच ती दिसत नसल्याने अश्चर्य व्यक्त होत आहे. मागील दोन वर्षात केवळ ५५ ठिकाणी वीज चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. यामध्ये ४६ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. इतरांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. एकीकडे वीज चोरी घरोघरी होत असताना केवळ ५५ दारीच ती आढळल्याने महावितरणकडून वीजचोरांकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.वीज चोरी रोखण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. यासंदर्भात महावितरणला विशेष पथके नियुक्त करून कारवाया करण्याचे आदेशही दिलेले होते. एवढेच नव्हे तर स्थानिक अभियंता, लाईनमन यांनाही वीजचोरांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ कार्यालयाकडून देण्यात आले होते. बीड जिल्ह्यात मात्र, याची कसलीच अंमलबजावणी झाली नसल्याचे दिसून येत आहे.तत्कालीन अधीक्षक अभियंता अजिनाथ सोनवणे यांनी कारवायांचा धडाका लावला होता. मात्र, सध्याचे अधीक्षक अभियंता संजय सरग यांच्या कार्यकाळात मात्र या कारवाया थंडावल्या आहेत. त्यामुळे सर्रास वीज चोरी केली जात आहे. याकडे मात्र महावितरणचे अधीक्षक अभियंता ते लाईनमनपर्यंतचे सर्वच जण दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. महावितरणच्या गलथान कारभारबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. वीज चोरांना सहकार्य करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.दरम्यान, महावितरणने वीजचोरांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.दोन वर्षात काय झाल्या कारवाया ?बीडचे अधीक्षक अभियंता संजय सरग यांच्या म्हणण्यानुसार लातुरचे पीआरओकडून माहिती घेतली.यामध्ये त्यांनी भारतीय विद्यूत कायदा २००३ च्या कलम १२६ नुसार ५५ ठिकाणी वीज चोरी झाल्याचे निदर्शनास आल्याचे सांगितले. पैकी १४ प्रकरणांमध्ये रक्कम भरली असून त्यांना १ लाख ३५ हजार रूपयांचा दंड आकारला.तसेच कलम १३५ नुसार ४६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यांना ३ लाख १६ हजार रूपयांचा दंड आकारल्याचे पीआरओंनी ‘लोकमत’ला सांगितले.अधीक्षक अभियंता संजय सरग यांनी भ्रमणध्वनी न घेतल्याने त्यांची बाजू समजली नाही.कोठे आणि कशी होते वीज चोरी?ग्रामीण भागात शेतातील विद्यूत पंप, वाड्या, वस्त्यांवर सर्रासपणे वीज चोरी होते.गावात तारेवर आकडे टाकूनी वीज चोरी केली जाते. तर शहरात नादुरूस्त मिटर, रिमोटद्वारे वीज चोरी केली जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.तसेच मिटरमध्ये किट बसवूनही वीज चोरी केली जात असल्याचे समजते.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण