शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील चित्रफीत व्हायरल; दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 00:02 IST

लहान मुलांची अश्लील चित्रफीत सोशल मीडिया व मोबाईलद्वारे व्हायरल केल्याप्रकरणी पोलीस व सायबर सेलने तपासचक्र फिरवित दोघांना अटक केली आहे.

ठळक मुद्देपाच दिवसांची पोलीस कोठडी : सायबर सेल, परळी शहर ठाण्याने केला संयुक्त तपास

अंबाजोगाई : लहान मुलांची अश्लील चित्रफीत सोशल मीडिया व मोबाईलद्वारे व्हायरल केल्याप्रकरणी पोलीस व सायबर सेलने तपासचक्र फिरवित दोघांना अटक केली आहे. त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयात रविवारी हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.या प्रकरणी तपास करण्याबाबत पोलीस उपमहानिरीक्षक बैजल यांनी बीड पोलीस अधीक्षकांना पत्राद्वारे दिलेल्या आदेशानुसार सायबर सेलच्या प्रभारी पोलीस उप निरीक्षक कोमल शिंदे व परळी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक एस.पी.कदम यांनी तपास केला.चित्रफीत ही परळी येथून व्हायरल झाली. त्याचा तपास करताना सोहम देवीलाल जाट याने त्याच्या मोबाईलचे सीमकार्ड त्याचा भाचा प्रकाशचंद्र जाट यास वापरण्यास दिले होते. त्यावरून त्याने अल्पवयीन मुलाची अश्लील चित्रफीत फेसबुक व मोबाईल वरून व्हायरल केल्याचे निष्पन्न झाले. म्हणून दोघांविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गु.र. नं.१३/२० कलम ६७ (क) माहिती तंत्रज्ञान कायदा व १३ (क) बाल लैंगिक अत्याचार कायदा अन्वये गुन्हा दाखल केला. तसेच आरोपींना जिल्हा व सत्र न्या. माहेश्वरी पटवारी यांच्या न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सदरील प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अशोक कुलकर्णी यांनी काम पाहिले. यातील सोहम (महाराज) हा अंबाजोगाई व बीड मध्ये आचारी म्हणून काम करत असे. मोबाईलचा गैरवापर चांगलाच महागात पडल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :BeedबीडSocial Mediaसोशल मीडियाArrestअटक