शहरं
Join us  
Trending Stories
1
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
2
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
3
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
4
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
5
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
6
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा
7
"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला"; जितेंद्र आव्हाडांना अटक करण्याची राष्ट्रवादीची मागणी
8
दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे
9
"AAP आणि काँग्रेसची युती कायम राहणार नाही, आम्ही फक्त..." केजरीवालांचे मोठे विधान
10
Netherlands vs Sri Lanka : वर्ल्ड कपच्या सुरुवातीलाच मोठा उलटफेर; नेदरलँड्सने श्रीलंकेचा उडवला धुव्वा
11
Fact Check : बीबीसीचा 'हा' व्हिडीओ २०२४ च्या निवडणुकीतील नाही; जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
12
"काँग्रेससोबत प्रेमविवाह किंवा अरेंज मॅरेज नाही, ४ जूननंतर..." युतीबाबत सीएम केजरीवाल यांचं मोठं विधान
13
जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; चूक लक्षात येताच मागितली माफी
14
मुंबई मनपानं नोटीस बजावली, तरीही २९ महाकाय होर्डिंग जसेच्या तसे!
15
'त्या' घटनेनंतर पुन्हा एक अब्जाधीश टायटॅनिकचे अवशेष पाहायला जाणार; जाणून घ्या कोण आहेत?
16
"...अन्यथा मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार"
17
लोकसभा निवडणुकीत भाजप जिंकल्यास रॉकेट बनतील 'हे' 'Modi Stocks', होऊ शकते बंपर वाढ
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण, हिंदाल्को-पॉवरग्रिडमध्ये तेजी; IT-बँकिंग शेअर्स घसरले
19
तलावाच्या खोदकामात JCB च्या खोऱ्यात अडकलं पोतं; उघडून पाहताच पैशाचं घबाड
20
Fact Check : कंगना राणौतसोबतच्या फोटोत गँगस्टर अबू सालेम नाही; जाणून घ्या, 'सत्य'

बीडमध्ये होतेय रुग्णालयांकडूनच प्रदूषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:38 AM

बीड शहरातील सम्राट चौकात एका दवाखान्यातील बायोमेडिकल वेस्टेज कचराकुंडीत टाकल्याप्रकरणी पाच हजार रुपये दंडाची कारवाई नगरपालिकेने गुरुवारी केली होती. हाच धागा पकडून जिल्ह्यातील बायोमेडिकल वेस्टेजची विल्हेवाट लावण्यासंदर्भात यंत्रणा कशी आहे याचा आढावा घेतला. यावेळी यंत्रणा तर अपुरी आहेच, शिवाय अनेक रुग्णालयातील कचरा योग्य पद्धतीने विल्हेवाट लावला जात नसल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देबायोमेडिकल वेस्टेजची योग्य विल्हेवाट लागेना; कुणालाच गांभीर्य नाही

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरातील सम्राट चौकात एका दवाखान्यातील बायोमेडिकल वेस्टेज कचराकुंडीत टाकल्याप्रकरणी पाच हजार रुपये दंडाची कारवाई नगरपालिकेने गुरुवारी केली होती. हाच धागा पकडून जिल्ह्यातील बायोमेडिकल वेस्टेजची विल्हेवाट लावण्यासंदर्भात यंत्रणा कशी आहे याचा आढावा घेतला. यावेळी यंत्रणा तर अपुरी आहेच, शिवाय अनेक रुग्णालयातील कचरा योग्य पद्धतीने विल्हेवाट लावला जात नसल्याचे समोर आले आहे. काही रुग्णालयांकडूनच प्रदूषण होत असल्याचे यावरुन स्पष्ट होते. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे साफ दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जिल्ह्यातील हॉस्पिटल व क्लिनिकमधून निघणारा कचरा उचलण्याची जबाबदारी बीडमधील चंपावती वेस्टेज मॅनेजमेंट या संस्थेला दिली आहे. ही संस्था जिल्ह्यातील नोंदणीकृत ३७६ हॉस्पिटल व क्लिनिकमधील कचरा उचलते. प्रत्यक्षात मात्र हॉस्पिटल व क्लिनिकची संख्या ५०० च्यावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावरुन बहुतांश लोकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परवानाच घेतला नसल्याचे स्पष्ट होते. असे असले तरी याची तपासणीची तसदी प्रदूषण मंडळ घेत नसल्याचे दिसून येते. कार्यालय व हॉस्पिटल यांच्या संगनमतानेच जिल्ह्यात परवाना न घेताच हॉस्पिटल, क्लिनिक सुरु असल्याचा आरोप सर्वसामान्यांमधून केला जात आहे.१५७ हॉस्पिटल : लक्ष देणे गरजेचेबीड शहरात १५७ हॉस्पिटल व क्लिनिकची नोंदणी आहे. जवळपास २५० किलोग्रॅम (जाळण्यायोग्य) कचरा निघतो. इंजेक्शन, सलाईन असा जाळता न येणारा कचरा १५० किग्रॅच्या घरात आहे. जिल्ह्यात ५०० ते ६०० किलोग्रॅम कचरा निघत असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. जाळण्यायोग्य कचऱ्याचे पाली येथील प्लॅन्टवर भस्मीकरण केले जाते. जो कचरा जाळता येत नाही त्यावर योग्य प्रक्रिया करुन सांगली येथे पाठविला जात असल्याचे संस्थेचे संचालक एस. बी. वाघमारे यांनी सांगितले.

अनेकांची नोंदणीच नाहीशहरासह जिल्ह्यात अनेक हॉस्पिटल व क्लिनिकने या संस्थेकडे नोंदणीच केलेली नाही.नगरपालिकेच्या घंटागाडी, कुंडीतच बायोमेडिकल वेस्टेज टाकले जात असल्याचे समोर आले आहे.असे कृत्य करणाºयांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

कचरा संकलनासाठी अपुरी वाहनेजिल्ह्यात नोंदणीकृत हॉस्पिटल व क्लिनिकची मोठी संख्या आहे. असे असतानाही संबंधित एजन्सीकडे बायोमेडिकल वेस्टेज संकलनासाठी केवळ चारच वाहने आहेत. याच वाहनांद्वारे दररोज जिल्ह्यातील कचरा संकलित केला जात असल्याचा दावा संस्थेने केला आहे. परंतु प्रत्यक्षात हा दावा फोल ठरु पाहत आहे. नियमित व वेळेवर वेस्टेज संकलन करुन होणारे प्रदूषण थांबवावे, अशी मागणी केली जात आहे. नगर पालिकेच्या अधिकारी, कर्मचाºयांनीही कचºयाचे नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच रस्त्यावर कचरा टाकून शहर अस्वच्छ करणाºयांवर कारवाईसाठी योजना आखण्याची गरज आहे. सध्या बीड पालिकेचा स्वच्छता विभाग चांगली कामगिरी करीत आहे. यापूर्वीचे अनुभव पाहता त्यात सातत्य ठेवले जात नाही. आता यामध्ये किती सातत्य राहते? हे वेळच ठरवेल.

सहा वर्षांपूर्वी कारवाईबीड शहरातील बसस्थानकासमोरील असलेल्या एका हॉस्पिटलमधील बायोमेडिकल वेस्टेज रस्त्यावर टाकल्याचे समोर आले होते. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधित हॉस्पिटलवर फौजदारी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर काही दिवस त्यांच्यामध्ये भीती होती. मात्र, सध्या पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :BeedबीडGarbage Disposal Issueकचरा प्रश्नhospitalहॉस्पिटलMarathwadaमराठवाडा