शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय मुंडे- सुरेश धस यांच्यात रंगल्या 'कानगोष्टी' ! दोघांना पाहून पंकजा मुंडेंचीही कोपरखळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 15:50 IST

मुंडे बहीण-भावासोबत सुरेश धस एकाच व्यासपीठावर; म्हसोबाची वाडी येथील ९४व्या नारळी सप्ताहात रंगली ‘राजकीय’ जुगलबंदी;

बीड / कडा : कृषी घोटाळा आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून गेल्या अनेक दिवसांपासून टोकाची टीका करणारे आमदार सुरेश धस आणि आमदार धनंजय मुंडे हे एकाच व्यासपीठावर 'कानगोष्टी' करताना दिसून आले. आष्टी तालुक्यातील म्हसोबाची वाडी येथे आयोजित ९४व्या नारळी सप्ताहाच्या सांगता समारंभात या दोन कट्टर राजकीय विरोधकांमधील जवळीक आणि रंगलेल्या 'कानगोष्टी' जिल्हाभरात चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात आमदार धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस शेजारीच बसले होते. राजकीय मैदानावर एकमेकांचे वाभाडे काढणारे हे दोन्ही नेते चक्क एकमेकांच्या कानात कुजबुजताना दिसले. त्यांच्यातील हा संवाद पाहून "नेमकं काय बोलणं झालं असेल?" असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीनंतर मुंडे बहीण-भावावर गंभीर आरोप करणाऱ्या आमदार धस यांनी यावेळी पंकजा मुंडेंचा उल्लेख ‘पंकजाताई’, तर धनंजय मुंडेंचा उल्लेख 'धनंजयजी' असा सन्मानाने केला.

या धार्मिक सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे, आमदार सुरेश धस, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी आ. भीमराव धोंडे, बाळासाहेब आजबे, साहेबराव दरेकर आणि प्रताप ढाकणे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. तीव्र राजकीय संघर्षानंतर धार्मिक कार्यक्रमाचा मुहूर्त साधून मुंडे बहीण-भाऊ आणि आमदार सुरेश धस एकत्र आल्याने राजकीय हवा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पंकजा मुंडेंची कोपरखळीव्यासपीठावरील हे दृश्य पाहून पंकजा मुंडे यांनीही आपल्या भाषणात चिमटा काढण्याची संधी सोडली नाही. "माझे बंधू धनंजय मुंडे, त्यांच्याच बाजूला बसून कानात बोलणारे आमदार सुरेश धस आणि या दोघांच्या गप्पा ऐकणारे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर..." असे म्हणत त्यांनी या त्रिकुटाच्या भेटीवर कोपरखळी मारली.

जयदत्त क्षीरसागरांची फडणवीसांशी जवळीक, पण..बीड नगरपालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी पडद्यामागून रसद पुरवूनही व्यासपीठावर जाण्याचे टाळणारे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी या धार्मिक सोहळ्यात मात्र मुख्यमंत्र्यांसोबत व्यासपीठ शेअर केले. तेव्हा केवळ हेलिपॅडवर पुष्पगुच्छ देऊन काढता पाय घेणाऱ्या क्षीरसागरांची आता मुख्यमंत्र्यांशी जवळीक वाढल्याचे स्पष्ट दिसत आहे. मात्र, एकीकडे मुख्यमंत्र्यांशी सलोखा वाढवत असतानाच दुसरीकडे बीड जिल्ह्यातील भाजप नेत्यांपासून त्यांनी राखलेले ‘ठराविक अंतर’ राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना खतपाणी घालत आहे. या नव्या समीकरणांचे नेमके 'पॉलिटिकल आउटपूट' काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकाच हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्री अन् मुंडे बहीण-भाऊ !मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांची हेलिकॉप्टरमधून एकत्रित 'एन्ट्री' झाली. व्यासपीठावर धनंजय मुंडेंचे नाव घेताच भाविकांनी 'डी.एम.'च्या घोषणा दिल्या. एका कार्यकर्त्याने तर फडणवीस यांचे भाषण सुरू असतानाच धनंजय मुंडे यांना मंत्री करण्याची मागणी केली. परंतु त्यांनी काही न बोलताच आभार मानून भाषणाचा समारोप केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Rivals Dhananjay Munde and Suresh Dhas in deep conversation; Pankaja's jab!

Web Summary : Political rivals Munde and Dhas were seen conversing closely at an event, sparking curiosity. Pankaja Munde quipped about their meeting. Amidst changing alliances, Jaydatt Kshirsagar's proximity to Fadnavis raises eyebrows, fueling political speculation in Beed.
टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेSuresh Dhasसुरेश धसPankaja Mundeपंकजा मुंडेJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागर