शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

पोलीस ठाण्यांमधील ‘डीबी’ पथक नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 00:39 IST

प्रत्येक पोलीस ठाण्यात नियूक्त केलेले डीबी (डिटेक्टिव्ह ब्रँच) पथक केवळ नावालाच असल्याचे समोर आले आहे. मागील दोन महिन्यात चोरी व बॅग लुटीच्या घटनांमध्ये वाढ झालेली असताना एकाही चोरीचा तपास लावण्यात या पथकांना यश आलेले नाही. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये भितीचे वातावरण असून या पथकांच्या कामकाजाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

ठळक मुद्देकामकाजावर प्रश्नचिन्ह : चोरी, बॅग लुटीच्या गुन्ह्यांचा तपास लागेना

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : प्रत्येक पोलीस ठाण्यात नियूक्त केलेले डीबी (डिटेक्टिव्ह ब्रँच) पथक केवळ नावालाच असल्याचे समोर आले आहे. मागील दोन महिन्यात चोरी व बॅग लुटीच्या घटनांमध्ये वाढ झालेली असताना एकाही चोरीचा तपास लावण्यात या पथकांना यश आलेले नाही. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये भितीचे वातावरण असून या पथकांच्या कामकाजाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात चोरी, घरफोडी, लुटमार, चैन चोरी सारख्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पोलिसांकडून तात्काळ घटनास्थळी जावून पंचनामा केला जातो. या घटनांचा तात्काळ तपास लागावा, यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एका डीबी पथकाची नियूक्त केलेले आहे. या पथकात साधारण एका अधिकाऱ्यासह पाच ते सहा कर्मचाºयांचा समावेश आहे. मात्र मागील काही महिन्यांपासून या पथकांची कामगिरी फारशी उल्लेखनीय नसल्याचे दिसून येत आहे.वारंवार एवढ्या घटना घडूनही डीबी पथक शांतच आहेत. त्यांच्या तपासाबद्दल आणि कामकाजावर आता संशय व्यक्त केला जात आहे. तसेच स्थानिक गुन्हे शाखा व दरोडा प्रतिबंधक पथकालाही या घटनांचा तपास लावण्यात अद्याप यश आलेले नाही. एकुणच मागील मागील काही दिवसांपासून पोलिसांच्या कामगिरीबद्दल नागरिक असमाधानी असल्याचे दिसून येत आहे.पोलिसांनी रखडलेल्या गुन्ह्यांचा तात्काळ तपास लावून नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करावा, तसेच शहरातील गस्तीमध्ये वाढ करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांंमधून होत आहे.नाव दरोड्याचे, अन् कारवाई जुगारावर४गंभीर व दरोड्याचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी दरोडा प्रतिबंधक ही विशेष शाखा आहे. मात्र ही शाखा सध्या गुटखा, जुगार व इतरच कारवाया करण्यातच व्यस्त असल्याचे दिसते.ठाणे प्रभारींचे दुर्लक्षआपल्या आखत्यारीत असलेल्या डीबी पथकाच्या नियमित कामगिरीचा आढावा घेण्यास संबंधीत ठाणे प्रमुखही उदासीन असल्याचे दिसते. त्यांच्या दुर्लक्षामुळेच हे पथक नावाला राहिले आहेत. प्रभारींनी वेळच्या वेळी आढावा घेण्याबरोबरच गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन केल्यास तपासाची टक्केवारी वाढू शकते. मात्र तसे होत नाही, हे विशेष.उपअधीक्षकांकडून कानाडोळाप्रत्येक उपविभागासाठी एक पोलीस उपअधीक्षक आहेत. सर्व जागा भरलेल्या आहेत. मात्र या उपअधीक्षकांकडून ठाणे प्रभारींच्या कामकाजाकडे कानाडोळा केला जात आहे. त्यामुळेच ठाण्यातील इतर पथके व अधिकारी, कर्मचारी सुस्त झाल्याचे दिसते.शिवाजीनगर ठाण्यानेकेला एक तपासशिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने एका साखळी चोराला पकडून दोन गुन्हे उघडकीस आणले होते. पोलीस उपनिरीक्षक आर.ए. सागडे यांनी ही कारवाई केली होती. तसेच सलग दोन दिवस कत्तलसाठी जाणारी दोन वाहने पकडून त्यातील ३० जनावरांना जीवदान दिले होते.बॅग लुटीच्या सात घटनामागील दोन महिन्यात बॅग लुटीच्या सात घटना घडल्या आहेत. बीडमध्ये चार, परळी दोन व अंबाजोगाईतील एका घटनेचा समावेश आहे. यामध्ये रोख लाखो रूपयांची रक्कम लंपास करण्यात आलेली आहे. तसेच दिवाळीत बीड शहर व शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत चोºया, घरफोड्या झालेल्या आहेत. याचा तपासही अद्याप लागलेला नाही.

टॅग्स :BeedबीडPolice Stationपोलीस ठाणे