शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

केकतसारणी शिवारातील जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा; वीस जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 18:11 IST

युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील  केकतसारणी शिवारातील जुगार अड्डयावर छापा

ठळक मुद्दे७ लाख ५० हजार रूपयांचा ऐवज जप्त

केज : युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील  केकतसारणी शिवारातील जुगार अड्डयावर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने गुरूवारी ( दि. २८ ) दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास छापा मारला. यात २० जणांना ताब्यात घेऊन ७ लाख ५० हजार रूपयांचा ऐवज जप्त केला. शुक्रवारी सकाळी २० जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष पथकाने येऊन केलेल्या या कारवाईमुळे तालुक्यात अवैध धंदे जोरात सुरु असल्याचे उघड झाले आहे. 

‌तालुक्यातील केकतसारणी शिवारात रामधन करांडे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये अनेक दिवसांपासून पत्याचा जूगार अड्डा सुरु असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकास मिळाली. यावरून सहायक पोलीस निरीक्षक विलास हजारे आणि कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकाने गुरूवारी दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास सापळा रचून जुगार अड्डयावर छापा टाकला. यावेळी २० जुगाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रोख १ लाख २१ हजार सत्तर रूपये आणि इतर मुद्देमाल असा ७ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शुक्रवारी सकाळी सहा वाजता युसुफवडगाव पोलीस ठाण्यात २० जुगाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पी. व्ही. कांदे करीत आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने येऊन केलेल्या या कारवाईमुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु असल्याचे उघड झाले आहे. या प्रकारांकडे स्थानिक पोलीसांचे दुर्लक्ष होत असल्याने जनतेतून संताप व्यक्त होत आहे. 

या जुगाऱ्यांवर झाला गुन्हा दाखल :राजाभाऊ आकुसकर (रा.आडस ता.केज), बाळासाहेब राऊत   (रा.चिंचोलीमाळी, ता. केज), लहु वाघमारे (रा.आडस), किसन जाधवर  (रा. रत्नापुर ता.कळंब), महादेव मस्के  (रा.भिमनगर ता.केज), श्रीराम केकाण (रा.केकाणवाडी), अमोल शेप (रा. लाडेवडगाव), बालासाहेब गालफाडे (रा. चिंचोलीमाळी), बाजीराव अंडील (रा. पाहाडी पारगाव), कलीम सय्यद (रा.अजीजपुरा केज), शीलवंत शिंदे (रा. लाडेवडगाव), सुरेश माने (रा. ब्रम्हणपुर ता.बीड), संतोष येवले  (रा.मादळमोही ता. गेवराई), अरुण माने (रा. ब्रम्हणपुर ता.बीड), कलीम शेख (रा. कोरडगाव ता.पाथर्डी  जि.अहमदनगर), दिलीप खरचन (रा. आखेगाव, ता.शेवगाव जि.अहमनगर), विष्णू ढोले (रा. आडस, मराठा गल्ली, आडस),  गोरख वायबसे (रा. कासारी, ता. केज), अशोक उजगरे ( रा.आसरडोह ता.धारुर) व  चरणदास काळे (रा.उमरत पारगाव ता.जि.बीड).

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीraidधाडBeedबीड