शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील पोलीस प्रथम क्रमांकावर असतील-सिंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 01:16 IST

औरंगाबाद परिक्षेत्रीय पलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन यावर्षी बीड शहरात करण्यात आले होते. बुधवारी या स्पर्धेचा समारोप औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : औरंगाबाद परिक्षेत्रीय पलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन यावर्षी बीड शहरात करण्यात आले होते. बुधवारी या स्पर्धेचा समारोप औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. तसेच त्यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना ते म्हणाले मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचारी चांगले काम करत आहेत. पुढील काही काळात राज्यात मराठवाड्यातील पोलीस सर्व बाबींमध्ये अव्वल असेल असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच बीड पोलिस दलाने केलेल्या नियोजनाचे देखील कौतुक केले.यावेळी बीड पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, उस्मानाबाद पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन, जालना पोलीस अधीक्षक एस.चौतन्य, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, स्वाती भोर, सर्व पोलीस उपअधीक्षक व इतर अधिकारी यांची उपस्थिती होती.औरंगाबाद परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन २१ ते २५ सप्टेंबर या कालावधिमध्ये करण्यात आले होते. यामध्ये औरंगाबाद शहर, औरंगाबाद ग्रामीण, जालना, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये ११ विविध क्रीडा प्रकारांचा समावेश होता. तसेच ४७२ पोलीस कर्मचारी खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. दरम्यान या क्रीडा स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन बीड पोलिसांनी केले होते. याचे देखील कौतुक पोलीस महानिरीक्षक यांनी केली.पुढे बोलतना डॉ.सिंगल म्हणाले बीड पोलीस दलाने या स्पर्धेचे उत्तम नियोजन केले होते. पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे सर्वबाजून आरोग्य चांगले राहवे यासाठी खेळ खेळणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पोलिसांनी विविध क्रीडा प्रकारामध्ये सहभाग घ्यावा व राज्यातील स्पर्धेत देखील यश मिळवावे, क्रीडा स्पर्धेमध्ये जिंकणे आणि हारणे या दोन गोष्टी असतात, परंतु खेळात सहभागी होणे सर्वात महत्तवाची बाब आहे त्यामुळे सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे स्वागत महानिरीक्षक डॉ.रवींद्र सिंगल यांनी केले. तसेच सर्वांना शुभेच्छा देत विविध क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याचा संदेश देखील या कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना दिला.या कार्यक्रमाचे प्रास्तावीक पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी केले तर आभार प्रदर्शन पोलीस अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी मानले. यावेळी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.औरंगाबाद ग्रामीण प्रथमस्पर्धेत ११४६ गुण प्राप्त करत औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी प्रथम क्रमांक पटकावला. तसेच १२८ गुणांची कमाई तरत औरंगाबाद शहर पोलिसांनी द्वितीय तर बीड पोलिसांनी १०७ गुण प्राप्त करत तृतीय क्रमांक मिळवला.या विजेत्या संघांचा तसेच उत्कृष्ट महिला खेळाडू व पुरुष खेळाडूंचा देखील सन्मान औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. रवंीद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते करण्यात आला.

टॅग्स :Beed policeबीड पोलीसBeed S Pपोलीस अधीक्षक, बीड