शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

बीडमध्ये पोलिसांकडून कॉफी शॉपच्या झडत्या सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 17:41 IST

पोलिसांच्या कारवाईवर पालकांमधून समाधान व्यक्त

बीड : शहरातील कॉफी शॉपमध्ये काही तरूण जोडपी अश्लिल चाळे करताना आढळून आली होती. त्यानंतर पोलिसांनी सर्वच हॉटेल आणि कॉफीशॉपवर नजर ठेवली होती. आजही त्यांच्या झडत्या सुरूच असून गैरप्रकार टाळण्याच्या दृष्टीने पोलिसांनी उचललेल्या पावलाबद्दल पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे. बीड शहरातील कॉफी शॉपमध्ये बसून काही जोडपी कॉफी पिण्याच्या नावाखाली अश्लिल चाळे करीत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी स्वत: पेट्रोलिंग दरम्यान कॉफी शॉपची तपासणी केली होती. यावेळी शाहूनगर भागातील एका शॉपमध्ये त्यांना पडद्याआड अंधाऱ्या कॅबीनमध्ये एक युगूल अर्धनग्न अवस्थेत आढळले होते. त्यांनी या जोडप्याला समज देऊन सोडले होते. तर दुकान मालकावरही कारवाई केली होती. या कारवाईनंतर त्यांनी सर्वच ठाणे प्रमुखांना शॉप, हॉटेलची तपासणी करण्याचे आदेश दिले होते.दामिनी पथकाला दिल्या सूचनाछेडछाड, गैरप्रकाराची माहिती मिळताच अथवा तक्रार येताच तात्काळ कारवाई करण्याचे आदेश कबाडे यांनी दामिनी पथकाला दिले आहेत. कोणावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेण्यासही त्यांनी सांगितले आहे. खोटी कारवाई झाल्यास पथकावरही कारवाई करण्याचा इशारा कबाडे यांनी दिला आहे.

कॉफीशॉपमध्ये गैरप्रकार घडत असतील तर आम्ही शांत बसणार नाहीत. प्रायव्हसी व इतर मुद्याला धरून पोलिसांवर आरोप होत असले, तरी आम्ही आमच्या कारवाया सुरूच ठेवणार. पालकांच्या तक्रारी आल्यावर थेट कारवाई केली जाईल. पालकांनीही आपल्या पाल्यांकडे थोडे लक्ष द्यावे. विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक, बीड