शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बीड पोलिसांचा दुजाभाव; लाच प्रकरणातील पोलिसाला दिले कोठडीबाहेर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 15:55 IST

कोठडीत उपचार न करता सर्वसामान्य रुग्णाप्रमाणे कोठडीबाहेर उपचार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी समोर आला आहे.

बीड : लाच प्रकरणात अटक केलेल्या पोलीस हवालदाराला न्यायालयीन कोठडी मिळाली. नंतर छातीत दुखू लागल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे कोठडीत उपचार न करता सर्वसामान्य रुग्णाप्रमाणे कोठडीबाहेर उपचार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी समोर आला आहे. नियमानुसार कोठडीबाहेर आरोपीला काढता येत नाही. मग तो कुख्यात असो वा सर्वसामान्य. आरोपी हा आरोपीच असतो. मात्र, बीड पोलिसांचा या निमित्ताने दुजाभाव चव्हाट्यावर आला आहे.

बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील हवालदार शंकर राठोड यांना १० हजार रुपयांची लाच घेताना जालना एसीबीने रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर कारागृहात पाठविण्यात आले. रविवारी राठोड यांच्या छातीत दुखू लागल्याने सायंकाळी पाच वाजता जिल्हा रुग्णालयात दाखल केले. बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारीही ठेवण्यात आला. मात्र, राठोड यांना कोठडीत ठेवून उपचार करण्याऐवजी डॉक्टरांनी कोठडीबाहेर उपचार केले असल्याचे समोर आले आहे.

एरव्ही आरोपीला भेटू न देणारे पोलीस या प्रकरणात मात्र शिथिल झाल्याचे दिसले. आपल्या खात्यातील कर्मचाऱ्याला त्यांनी ‘माणुसकी’तून सूट दिली. आता ही सूट त्यांच्या अंगलट येणार असल्याचे बोलले जात आहे. आरोपी हा आरोपीच असतो. आवश्यक त्या सर्व जबाबदाऱ्या व काळजी घेणे अपेक्षित असतो. मात्र, या प्रकरणात पोलिसांनी दुजाभाव केल्याने त्यांच्याबद्दल संशय व्यक्त होत आहे. यावर काय कारवाई होते  ? याकडे लक्ष लागले आहे.

नातेवाईकांचा गराडा

सोमवारी सकाळी ११.३० वाजता शंकर राठोड यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांच्याभोवती नातेवाईकांचा गराडा होता. यामुळे बाजूच्या रुग्णांना त्रास सहन करावा लागला. हा प्रकार येथील सुरक्षारक्षक पाहत होते. मात्र, त्यांनी याकडे कानाडोळा केला.

काय म्हणतयं पोलीस- आरोग्य प्रशासन...याबाबत अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांना विचारले असता, कोठडीबाहेर उपचार करणे चुकीचे असल्याचे सांगितले. तात्काळ वार्डमध्ये संपर्क करुन कोठडीत ठेवण्याचे आदेश थेट पोलीस कर्मचाऱ्यालाच फोनवरुन दिले. तर वार्डचे प्रमुख डॉ. बाळासाहेब टाक म्हणाले, मी उपचार केले तेव्हा आरोपी कोठडीबाहेरच होता. रुग्ण दाखल झाल्यापासून काय झाले ते मला माहीत नाही. माहिती घेऊन सांगतो असे ते म्हणाले. यावरुन प्रमुखांनाही वार्डमधील या गंभीर प्रकाराची माहिती नसल्याचे समोर येते. ही जबाबदारी आपली नसून, पोलिसांची असल्याचे सांगत त्यांनी हात झटकले.

शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पगार म्हणाले, कोठडीबाहेर उपचार करता येत नाहीत. येथील सुरक्षारक्षकाची ही जबाबदारी आहे. गैरप्रकार घडल्यास अंगलट येऊ शकते. याची माहिती घेतली जाईल. चौकशी करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Beed policeबीड पोलीसCorruptionभ्रष्टाचारArrestअटकBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीड