शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये नियम मोडणाऱ्या वाहनचालकांच्या घरी जाणार पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 01:02 IST

मोटार वाहतूक नियमांचा भंग करणाºया वाहन चालकांवर पोलिसांची नजर असून सीसीटीव्हीच्या फुटेजचा आधार घेऊन कारवाईसाठी पोलीस संबंधित वाहन चालकांच्या घरापर्यंत पोहोचणार आहेत. १५ आॅगस्टपासून सुरु केलेल्या या कारवाईत चार दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे६० सीसीटीव्हीचे पॅनल कंट्रोल रुममध्ये

बीड : मोटार वाहतूक नियमांचा भंग करणाºया वाहन चालकांवर पोलिसांची नजर असून सीसीटीव्हीच्या फुटेजचा आधार घेऊन कारवाईसाठी पोलीस संबंधित वाहन चालकांच्या घरापर्यंत पोहोचणार आहेत. १५ आॅगस्टपासून सुरु केलेल्या या कारवाईत चार दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

शहरात नगर पालिकेद्वारे ६० सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक चौकात व महत्वाच्या ठिकाणी बसविण्यात आलेले आहेत. या कॅमेºयांचे कंट्रोल पॅनल हे पोलीस नियंत्रण कक्षात बसविण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी कारवाईच्या सूचना करण्यात आल्या. नियंत्रण कक्षामध्ये असलेल्या ६० कॅमेºयांचे वाहतूक कर्मचारी पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज पाहून नियमबाह्य वाहन चालविणाºया वाहन चालकांविरुद्ध प्रत्यक्ष कारवाईचे काम १५ आॅगस्टपासून सुरू करण्यात आले.

वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाºया चार दुचाकी चालकांचा त्यांच्या घरापर्यंत शोध घेऊन दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांना प्रत्येकी २०० रूपये दंड याप्रमाणे एकूण ८०० रूपये दंड वसूल केला.पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बुधवंत व वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांनी ही कारवाई केली. अशा प्रकारची कारवाई यापुढेही चालू राहणार आहे. वाहन चालकांनी शहरात नियमांचे पालन करून वाहन चालवावे, उल्लंघन न करता शहरातील वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी सहकार्य करावे असे जिल्हा वाहतूक पोलीस विभागाने कळविले आहे.

असा घेणार शोध, अशी होणार कारवाईपोलीस नियंत्रण कक्षातील कंट्रोल पॅनलवर वाहन चालकाने वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसणार आहे. ट्रिपल सीट, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, रॉँग साईडने वाहन चालविणे व इतर प्रकारे नियमभंग होताना दिसल्यास सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात येईल.त्यांच्या वाहनांचे नंबर पाहून वाहनाचे रजिस्ट्रेशन तपशीलावरून संबंधित चालकाचा पत्ता शोधून त्याच्या घरी जाऊन ही कारवाई करण्यात येणार आहे.

बंदोबस्ताला ड्रोन कॅमेराएकीकडे वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी उपाय सुरू असताना दुसरीकडे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सण- उत्सवांच्या काळात मिरवणूक व जिल्हा पोलीस दल बंदोबस्तामध्ये ड्रोन कॅमेरे वापरणार आहे. यामुळे नियंत्रण करणे सुलभ होणार आहे.

टॅग्स :Beedबीडtraffic policeवाहतूक पोलीसMarathwadaमराठवाडा