शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांपासून संरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तरुणाने घेतले विष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 12:50 IST

समाधान धिवार याने १ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.

बीड : गावातील लोकांकडून होणाऱ्या सततच्या त्रासामुळे पोलीस संरक्षण द्यावे, या मागणीसाठी एका तरुणाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात विषारी द्रव प्राशन केले. त्यास तातडीने जिल्हा रुग्णालयात पाठविले असून प्रकृती स्थिर आहे. ४ जुलै रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.

समाधान शिवाजी धिवार (२५, रा. काळेगाव घाट, ता. केज) असे त्या तरुणाचे नाव आहे. ४ जुलै रोजी त्याने जिल्हाधिकारी कार्यालय आवारात विषारी द्रव प्राशन केले. प्रवेशद्वारावर तो भोवळ येऊन पडल्यानंतर पोलिसांनी धाव घेतली. याचवेळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची गाडी कार्यालयात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी गाडीतून खाली उतरून संबंधित तरुणाला जिल्हा रुग्णालयात पाठविण्याचे निर्देश पोलिसांना दिले.

शिवाजीनगर ठाण्याचे सहायक निरीक्षक भारत काळे, अंमलदार आशिष वडमारे, संतोष रणदिवे, अभिजित सानप यांनी त्यास तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी तातडीने उपचार सुरू केले. याबाबत उशिरापर्यंत शिवाजीनगर ठाण्यात नोंद झाली नव्हती. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

आत्मदहनाचा दिला होता इशारासमाधान धिवार याने १ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. त्यात नवनाथ सोनवणे, इरफान शेख, जितेंद्र सोनवणे, बाबा शेख, शौकत शेख (सर्व रा.मस्साजोग) हे पैशासाठी त्रास देत असल्याचा आरोप केला होता. त्यांच्याकडून गंभीर गुन्हा होण्याची शक्यता असून वृद्ध आईवडिलांनादेखील ते भेटू देत नाहीत. त्यांच्यापासून संरक्षण द्यावे, अशी मागणी समाधान धिवारने केली होती. ३० जूनपर्यंत योग्य ती कारवाई न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा त्याने दिला होता.

विष प्राशन करणारा तरुण ऊसतोड मजूर आहे. त्याचा ज्यांच्यावर आरोप आहे, ते मुकादम आहेत. उचलीच्या पैशांचा मूळ वाद आहे. यापूर्वी समाधानच्या आईच्या फिर्यादीवरुन संबंधितांवर गुन्हा नोंद केला होता. शुल्क भरल्याशिवाय संरक्षण देता येत नाही. योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.- शंकर वाघमोडे, सहायक निरीक्षक, केज

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड