शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सरकारकडून धर्माच्या नावाखाली विष -शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:26 IST

महाराष्ट्रात गंभीर दुष्काळी परिस्थिती असताना केंद्र आणि राज्य सरकारकडून अद्याप मदत दिली जात नाही. जनतेला मदत करण्याची या सरकारची भावनाच नाही. जनावरांना चारा नाही. एकही छावणी सुरु नाही. रोजगार हमीची कामे नाहीत. याकडे लक्ष देण्याऐवजी हे सरकार धर्माच्या नावाखाली समाजामध्ये विष पसरवत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी येथे केली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरळी (जि. बीड) : महाराष्ट्रात गंभीर दुष्काळी परिस्थिती असताना केंद्र आणि राज्य सरकारकडून अद्याप मदत दिली जात नाही. जनतेला मदत करण्याची या सरकारची भावनाच नाही. जनावरांना चारा नाही. एकही छावणी सुरु नाही. रोजगार हमीची कामे नाहीत. याकडे लक्ष देण्याऐवजी हे सरकार धर्माच्या नावाखाली समाजामध्ये विष पसरवत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी येथे केली.परळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्र पक्ष आघाडीच्या वतीने शनिवारी दुसऱ्या संयुक्त जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, प्रा. जोगेंद्र कवाडे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आदी उपस्थित होते.या सरकारने धनगर, मराठा, मुस्लिम समाजाची आरक्षणाच्या मुद्दावर फसवणूक केली आहे. शेतकरी, तरु ण बेरोजगारांचीही दिशाभुल केली आहे. जाती धर्माच्या नावावर द्वेष पसरविला जात आहे. आरक्षणाच्या माध्यमातूनही जातीय धोरण अवलंबिले जात आहे. जनतेमध्ये दुही पसरविण्याचे काम या सरकारकडून होत असल्याचे पवार म्हणाले....तर हे सरकार संविधान बदलेल- अशोक चव्हाण३० टक्के मतांच्या जोरावर त्यांनी सत्ता मिळविली. ७० टक्के मतदान विखुरल्यामुळे ते सत्तेत आले. विखुरलेल्या मतदारांना एक करण्यासाठी ही महाआघाडी एक झाली आहे. राज्यात व केंद्रात सत्ता परिवर्तन अटळ आहे. यांच्या हाती पुन्हा सत्ता दिलीच तर पाच वर्षात आपल्याला मतदानाचा अधिकार राहणार नाही, ते संविधान बदलतील अशी भीती माजी मुख्यमंत्री व कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. चव्हाण म्हणाले, दुष्काळात शेतकºयांना शासनाने कसलीही मदत केली नाही. त्यामुळे हे सरकार भिकारी सरकार आहे. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा हम करे सो कायदा सुरू आहे. मराठवाड्यातील जनतेला या सरकारच्या काळात काहीच मिळाले नाही. केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र व मंत्रालयात उंदरं असल्याची खिल्लीही चव्हाण यांनी उडवली.

टॅग्स :BeedबीडSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस