शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'जनतेचे प्रेम,आशीर्वादच माझी ढाल'; परळीत भव्य स्वागतानंतर धनंजय मुंडे भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 13:24 IST

जेसीबीतून फुलांची उधळण, क्रेनमधून भव्य हार, बँड पथके, मुंबई येथील ढोल ताशाच्या गजरात धनंजय मुंडे याचे स्वागत करण्यात आले.

परळी (बीड): परळीच्या जनतेने मला कधीच मोजून मापून प्रेम दिले नाही, जे दिले ते भरभरून दिले आहे. त्यामुळे मी आजपर्यंत काय करू शकलो, याचा हिशोब देखील मोजणार नाही. आजवर जी कामे केली, कोविड काळात जे मदतकार्य केले, विकासाचे जे स्वप्न घेऊन आपण वाटचाल करतो आहोत, त्याचे मोजमाप तेव्हाच पूर्ण होईल, जेव्हा परळीचे नाव देशात अभिमानाने घेतले जाईल, असा विश्वास माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी  परळीत आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला.

ग्रामीण भागातील विकासाच्या पूरक योजना यासाठी आपण कायम प्रयत्नशील असून पुढेही हे विकास पर्व अधिक जबाबदारीने पूर्ण करू व कायम सेवेत राहू, असे अभिवचन मुंडे यांनी पुढे बोलताना दिले. मागील महिन्यात परळीत कार अपघातात जखमी झाल्यानंतर उपचार घेऊन सुमारे 40 दिवसांनी धनंजय मुंडे प्रथमच परळीत परत आले होते, यावेळी परळी मतदारसंघात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. येथील मोंढा मैदान येथे त्यांचा स्वागत सत्कार रविवारी करण्यात आला

छत्रपती संभाजी महाराज चौक (ईटके कॉर्नर) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी धनंजय मुंडे यांची पेढेतूला करून आनंद साजरा केला.  तेथून धनंजय मुंडे यांची वाजतगाजत स्वागत रॅली काढण्यात आली. ही रॅली पुढे उड्डाण पूल, सुभाष चौक, रोडे चौक, राणी लक्ष्मीबाई टॉवर या मार्गे मोंढा मैदान येथे पोचली. रॅली मार्गात केरळ, उज्जैन, तिरुपती बालाजी येथील खास बँड पथके, मुंबई येथील ढोल ताशा पथक तसेच आकर्षक विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली

धनंजय मुंडे  पुढे म्हणाले, आमदार म्हणून हजारो मतांनी तुम्ही निवडून दिले. तुमच्या आशीर्वादाने मंत्री झालो. पण पुढे दोनवेळा कोरोना बाधा झाली, मेंदूचा अटॅक आला, आता अपघात झाला. तसेच मधल्या काळात राजकीय सोबतच कौटुंबिक विषयात देखील वेगवेगळे आरोप झाले. मात्र या सर्व परिस्थितीत मतदारसंघातील जनतेचे प्रेम व आशीर्वादच माझी ढाल होती. त्याचमुळे मी आज पुन्हा तुमच्या समोर उभा आहे, असे भावोद्गार देखील त्यांनी व्यक्त केले. 

परळी मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करत असताना मला आजवर इथल्या जनतेने अभूतपूर्व प्रेम दिले. जोपर्यंत तुमचे हे प्रेम आहे तोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे. अखेरच्या श्वासापर्यंत माझे जीवन माझ्या मतदारसंघातील जनतेच्या सेवेत समर्पित आहे, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी मतदारसंघातील जनतेप्रति ऋण व्यक्त केले. यावेळी त्यांनी राम अवतार त्यागी यांच्या, 'मेरे स्वप्न अर्पित, मेरे प्रश्न अर्पितआयु का क्षण क्षण मेरे समर्पितचाहता हूँ ऐ परली की धरती तुझे कुछ और भी दूं।' या ओळीतून भावना व्यक्त केल्या.

गोपीनाथ गड परिसरात पांगरी ग्रामपंचायतचे सरपंच सुशील वाल्मिकराव कराड तसेच उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य व पांगरी ग्रामस्थांच्या वतीने धनंजय मुंडे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. पांगरीकरांनी आपल्या लाडक्या नेत्यावर पुष्पवृष्टी करत देशाच्या विविध भागातून बोलवलेल्या खास बँड पथकांच्या वाद्यवृंदात धनंजय मुंडे यांचे स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. राजेश्वर चव्हाण, . आ. संजय दौंड, माजी आ. पृथ्वीराज साठे, ज्येष्ठ नेते राजकिशोर मोदी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अजय मुंडे, ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड, रा कॉ.चे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ,राजस्थानी मल्टिस्टेट चेअरमन चंदुलाल बियाणी, नाथऱ्याचे सरपंच अभय मुंडे प्रा. मधुकरराव आघाव, रा.कॉ.चे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, ,  बाळासाहेब देशमुख, प्रा. विनोद जगतकर जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय राष्ट्रवादी काँग्रेस, जाबेर खान पठाण, ऍड. गोविंदराव फड,  यांसह विविध आघाडीचे पदाधिकारी, फ्रंटल सेलचे अध्यक्ष, तसेच मान्यवर उपस्थित होते. महेश मुंडे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेBeedबीड