शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादहून तुळजापूरकडे जाणाऱ्या भाविकांना मारहाण करून लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 00:39 IST

औरंगाबादहून तुळजापूर येथे दर्शनासाठी निघालेल्या कुटूंबाला लाकडी दांडे आणि दगडाने बेदम मारहाण करत चोरट्यांनी त्यांच्याकडील रोख रक्कमेसह दागिने असा दीड लाख रुपयांचा किंमती ऐवज लंपास केला.

ठळक मुद्देचौसाळा येथील घटना : चोरांच्या हल्ल्यात चौघे गंभीर जखमी; शुक्रवारी पहाटेची घटना

बीड : औरंगाबादहून तुळजापूर येथे दर्शनासाठी निघालेल्या कुटूंबाला लाकडी दांडे आणि दगडाने बेदम मारहाण करत चोरट्यांनी त्यांच्याकडील रोख रक्कमेसह दागिने असा दीड लाख रुपयांचा किंमती ऐवज लंपास केला. पंक्चर झालेले कारचे चाक बदलत असताना रोड रॉबरीची ही थरारक घटना बीड तालुक्यातील चौसाळा बाह्यवळण रस्त्यावर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. या मारहाणीत चौघे गंभीर जखमी झाले आहेत.बाळासाहेब ढोणे (४०), वैशाली बाळासाहेब ढोणे (३५), भागिरथी त्र्यंबक ढोणे (६०) व चालक चतुरसिंह लक्ष्मण राजपुत (४७ सर्व रा. औरंगाबाद) अशी जखमी भाविकांची नावे आहेत. बाळासाहेब ढोणे हे किराणा व्यापारी असून औरंगाबादमध्ये ते किराणा दुकान चालवतात. पत्नी वैशालीसह त्यांचे दोन मुले व भागिरथी ढोणे यांच्यासह ते कारमधून (क्र.एम.एच.२० डी.एफ ०७३०) गुरुवारी रात्री उशिरा औरंगाबाद येथून तुळजापूर येथे दर्शनासाठी निघाले होते. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास ते चौसाळा बायपासनजीक आले. याचवेळी त्यांच्या कारचे चाक पंक्चर झाले. चालकाने पंक्चर झालेले चाक काढून तेथे गाडीतील दुसरे चाक बसवले. ते पुढे निघणार याचवेळी अंधारातून पाच ते सात चोरटे हातात लाकडी दांडके घेवून तेथे आले. काही समजण्याच्या आत त्यांनी कारमधील कुटूंबीयांना बेदम मारहाण सुरु केली. कारमधील दोन लहानगे मात्र चोरांच्या मारहाणीतून बचावले. अचानक झालेल्या या हल्ल्याने सारेच भयभीत झाले. चोरट्यांनी गाडीवरही दगडफेक करत काचा फोडल्या. कारमधील वैशाली ढोणे व भागीरथी ढोणे यांनाही मारहाण करत त्यांच्या कानातील दागिने हिसकावुन घेत गंभीर दुखापत केली. तर बाळासाहेब ढोणे व चालक चतुरसिंह यांचेही डोके फोडले. बेदम मारहाण होत असल्याने आमच्याकडील ऐवज घेवून जा पण मारहाण करु नका, अशी विनंतीही त्यांनी केली. मात्र चोरट्यांनी मारहाण सुरुच ठेवली. किंमती ऐवज काढून घेतल्यानंतर चोरटे पसार झाले. या घटनेने चौसाळा परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी चौसाळा चौकीतील कर्मचाऱ्यांसह स्थागुशाच्या पोलीसांनी भेट दिली. नेकनूर ठाण्यात गुन्हा नोंद आहे.पेट्रोलपंपाचा घेतला आसराचोरट्यांच्या हल्ल्यात जखमी अवस्थेतील भाविक जवळच्या पेट्रोलपंपावर पोहचले. घडलेला प्रकार कथन केल्यानंतर चौसाळा चौकीतील कर्मचारी तिथे आले त्यानंतर सर्वांना चौसाळा चौकीत व नंतर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. भाविकांची कार पोलीसांनी चौसाळा चौकीसमोर आणून उभी केली.

टॅग्स :BeedबीडRobberyदरोडाBeed policeबीड पोलीस