शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पोकरा योजनेतील आठ हजार शेतकऱ्यांचे अनुदान प्रलंबित

By शिरीष शिंदे | Updated: September 19, 2023 15:59 IST

बीड जिल्ह्यातील स्थिती : योजना शेवटच्या टप्प्यात, वाटपाची गती मंदावली

- शिरीष शिंदेबीड: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरा योजनेत सहभागी झालेल्या जिल्ह्यातील ७ हजार ७३० लाभार्थींचे अनुदान जवळपास सहा महिन्यांपासून रखडले आहे. पोकरा योजना आता अंतिम टप्प्यात आली असून लाभार्थींना लवकर अनुदान मिळणे आवश्यक आहे. विलंब लागत असल्याने लाभार्थी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यात सुरू असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरा योजनेचा पहिला टप्पा आता संपत आला आहे. मागील दोन महिन्यांपासून नवीन अर्ज स्वीकृती करणे बंद आहे. टप्प्याटप्प्याने प्रत्येक घटक बंद करण्यात येत आहे. दरम्यान, पोकरा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागत होता. त्यानंतर ज्या घटकासाठी म्हणजे ठिबक, तुती लागवड, स्प्रिंकलर यासाठी शेतकऱ्यांना आधी स्वत: पैसे खर्च करावे लागत होते. कामे पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान रक्कम जमा केली जात होती. परंतु मागील सहा महिन्यांपासून ७ हजार ७३० लाभार्थींचे अनुदान रखडलेले आहे. ७व्या डेस्कवर म्हणजेच मुंबई येथील प्रकल्प संचालक स्तरावर प्रलंबित आहे. योजनेसाठी शेतकऱ्यांनी स्वत: पैसे खर्च केले असल्याने तात्काळ अनुदान द्यावे, अशी मागणी होत आहे.

शेतकऱ्यांची स्थिती नाजूकसध्या पाऊस नसल्यामुळे पिके कोमेजून गेली आहेत. अशा स्थितीत शिवारामध्ये निरुत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाणी नसल्याने पिके हातची जाण्याची शक्यता आहे. दुष्काळासारखी स्थिती ओढवली आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरण्या केल्या आहेत. पिके वाया गेली तर त्यांना दुसरा मोठा आर्थिक आधार नाही. अशा कठीण प्रसंगी शेतकऱ्यांनी स्व:खर्चातून पूर्ण केलेल्या घटकासाठीचा निधी तात्काळ देणे अपेक्षित आहे.

४३ हजार ३७४ शेतकऱ्यांना १८ हजार ४८१ कोटी वाटपनानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील ४३ हजार ३७४ शेतकऱ्यांना १८ हजार ४८१ कोटी रक्कम अनुदानस्वरूपात वाटप करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना अनुदान वाटप झाले असले तरी आता पोकरा योजनेचा अंतिम टप्पा आला असल्याने उर्वरित अनुदान रक्कम वेळेत दिली पाहिजे.

आकडेवारी आहे, पण रक्कम नाही४३ हजार ३७४ शेतकऱ्यांचे अनुदान प्रकल्प संचालक कक्षस्तरावर प्रलंबित आहे. परंतु किती कोटी रुपये अनुदान प्रलंबित आहे, याची आकडेवारी देण्यात आलेली नाही. ही आकडेवारी काढता येत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

असे आहे रखडलेले अनुदानतालुका - संचालकस्तरावर प्रलंबित - वितरीत अनुदान वाटपअंबाजोगाई - ४५५ - ४६०८केज - १४०० - ५१५३परळी - २०४ - २११३बीड - ८२५ - ५३७७आष्टी - ५३४ - ३६७६पाटोदा - २७ - ८२६शिरूर - १४५ - १५३७धारूर - २३७ - ३२४९गेवराई - ३४२५ - १३३११माजलगाव - २८९ - २४३८वडवणी - १८९ - १०८६एकूण - ७७३० - ४३३७४

टॅग्स :FarmerशेतकरीBeedबीड