शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
5
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
6
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
7
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
8
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
9
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
10
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
11
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
12
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
13
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
14
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
15
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
16
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
17
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
18
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
19
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
20
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले

१५ दिवसांत बिल भरा, नसता बत्ती गुल; महावितरणची बीडमधील सरकारी कार्यालयांना नोटिस

By अनिल भंडारी | Updated: February 3, 2025 18:14 IST

बीड जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांकडे १०८ कोटींचे विजबिल थकीत;सरकारी कार्यालय प्रमुखांना झटका

बीड: जिल्ह्यातील सरकारी कार्यालयांकडे कोट्यवधींची वीजबिले थकलेली आहे. हे वीजबिल वसूल करण्याचे आव्हान महावितरणसमोर आहे. या वसुलीसाठी अधीक्षक अभियंत्यांनी कडक मोहीम हाती घेतली असून कार्यालय प्रमुखांनी १५ दिवसात वीजबिल भरावे, अन्यथा थेट वीज कनेक्शन कट करण्यात येईल, अशा नोटिसा देण्यात आल्या आहेत.

राज्य व केंद्र शासनाच्या जिल्ह्यातील कार्यालयांकडे तब्बल ४९ कोटी ३ लाख ३९ हजार १९८ रुपये बाकी असून, व्याजासह ही रक्कम तब्बल १०८ कोटी १४ लाख २२ हजार ३३४ रुपयांवर जाऊन ठेपली आहे. यात कमी दाबाचे कनेक्शन आणि उच्च दाबाचे कनेक्शनचे या प्रवर्गातील हे वीजबिल आहे. दर महिन्याला महावितरणकडून नियमित केंद्र व राज्य सरकारी कार्यालयांना वीजबिल दिले जाते. मात्र, सरकारी कार्यालयांकडून दरवर्षी मार्च महिन्यात एकदाच पाच ते सहा लाखांची बिले काढली जातात. एकरकमी हे पैसे भरल्यामुळे दर महिन्याचे व्याज शिल्लक राहते. त्यामुळे सरकारी कार्यालयांच्या थकीत बिलांवरील व्याजाचा आकडा फुगलेला आहे. सरकारी कार्यालयांकडे जवळपास ५० कोटींचे वीजबिल थकलेले आहेत. मात्र, अद्याप एकाही कार्यालयाची वीज कट केली गेली नाही. परंतु आता सर्व शासकीय कार्यालयांच्या प्रमुखांना वीज कनेक्शन कट करण्यासंदर्भात नोटिसा दिल्या आहेत.

सामान्य थकबाकीदारांची तातडीने होते वीज कट-महावितरण सर्वसामान्य नागरिकांकडून सक्तीने वीजबिल वसूल करते. वीजबिल थकले की वीज कनेक्शन तोडण्यापर्यंत कार्यवाही होते. मात्र, याच्या उलट न्याय शासकीय कार्यालयांना आहे. कोट्यवधींची बिले नियमित न भरल्याने आणखी कोट्यवधींचे व्याज झाले आहे. वर्षानुवर्षे ही थकबाकी न भरल्यामुळे जेवढे बिल आहे तेवढे व्याज आता सरकारी कार्यालयांना भरावे लागणार आहे. म्हणजेच सरकारकडे जनतेने जमा केलेल्या टॅक्समधील जवळपास ५० कोटींची रक्कम ही नियमित वीजबिल न भरल्याने महावितरणला फुकट द्यावी लागणार आहे. व्याजाचा आकडा फुगत चालला असताना एकाही कार्यालयाची वीज कट नाही

वीज बिलांची कार्यालयानुसार थकबाकी: जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यालये - ४० कोटी १० लाख ५५ हजार ९६५जिल्ह्यातील नगरपालिका व नगर परिषद -७ कोटी ५६ लाख ९७ हजार ५०५जिल्हा परिषद - ६० लाख ६ हजारगृह विभाग- १२ लाख ६ हजार ७३५महसूल व वन विभाग-१ लाख ८३ हजारजिल्हाधिकारी कार्यालय - २ लाख ९५ हजार ९३५शिक्षण विभाग - १ लाख ८० हजार ७४०सार्वजिनक बांधकाम विभाग - १६ लाख २५ हजार १५०सिंचन विभाग -२४ लाख ६५ हजार ३६४सार्वजिनक आरोग्य विभाग - ५ लाख ९५ हजार ६७६कृषी विभाग - ३ लाख ३२ हजार ९९५महिला व बालकल्याण विभाग-१ लाख ६२ हजार ६९३राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण - ३ लाख २३ हजार ११२विविध सरकारी कार्यालये - १३ लाख

टॅग्स :Beedबीडmahavitaranमहावितरण