शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

बचत गटांना पावला बाप्पा, प्रदर्शनात ३४ लाखांची विक्री

By अनिल भंडारी | Updated: September 30, 2023 18:58 IST

उमेद गौरी गणेशोत्सव : जिल्ह्यात ११ तालुक्यांत आयोजन, नागरिकांचा प्रतिसाद

बीड : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत आयोजित ‘उमेद गौरी गणेशोत्सव’ विक्री व प्रदर्शन उपक्रमात जिल्ह्यातील ५४ गटांतील महिलांनी ३४ लाख रुपयांची विक्रमी विक्री केली. बीडसह जिल्ह्यातील ११ तालुक्यांत हा उपक्रम राबविण्यात आला असून गौरी गणेशासह ‘लक्ष्मीदर्शन’ झाल्याने बचत गटांना बाप्पा पावले आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक व राज्याच्या अभियान व्यवस्थापन कक्षाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात १७ ते १९ सप्टेंबरदरम्यान हा उपक्रम राबविला. सार्वत्रिक बाजारपेठा उपलब्ध व्हाव्या म्हणून विविध गावांमध्येसुद्धा स्वयंसाहाय्यता गटांच्या माध्यमातून उत्पादित मालाची विक्री मोठ्या प्रमाणात केली जात आहे. या प्रदर्शनात गौरी गणपती, महालक्ष्मी मूर्ती, मलाई पेढे, प्रसादाचे साहित्य, शोभेच्या वस्तू, कुरवड्या, पापड्या, खरवड्या, नाश्ता, जेवणाची व्यवस्था, शोभेच्या विविध वस्तू, महिलांनी तयार केलेले सजावटीचे, विणकाम केलेल्या वस्तूंची विक्रमी विक्री झाली. यातून बचत गटांच्या महिलांनी ३४ लाख ३५ हजार रुपयांचा व्यवसाय केला. यामुळे गरिबातील गरीब कुटुंबांना या विक्रीच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य लाभले. या गटांना प्रकल्प संचालक संगीता देवी पाटील, जिल्हा अभियान व्यवस्थापक त्रिवेणी भोंदे ,जिल्हा व्यवस्थापक शकील शेख , जिल्हा व्यवस्थापक आशा पवार, मुरहरी सावंत तसेच तालुका व्यवस्थापकांचे मार्गदर्शन लाभले.

प्रदर्शन व बाजारपेठेत स्टॉलबचत गटाच्या ५४ महिलांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला. अंबाजोगाई, आष्टी, केज, गेवराई, धारूर, परळी, पाटोदा, बीड, वडवणी, शिरूर कासार तालुक्यांत प्रदर्शन आणि स्टॉल लावण्यात आले होते.

१७ हजारांवर शाडूच्या मूर्तींची विक्री५४ गटाच्या महिलांनी गणपती आणि लक्ष्मी मुखवटे स्वत: कारखान्यात तयार करून विक्रीसाठी ठेवले होते. २० हजार ७०९ मूर्तींपैकी १७ हजार ७७ मूर्तींची विक्री झाली. यात शाडूच्या मूर्तींचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. एकूण ३४ लाख ३५ हजार १४० रुपयांची विक्री झाल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :BeedबीडGanpati Festivalगणेशोत्सव