शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

महिला सीओंना धमकी देणाऱ्या नगराध्यक्षपतीला पाटोदा पोलीस निरीक्षकांचे अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 18:04 IST

आरोपीला अटक का केली नाही, याबाबत मी एसपी साहेबांना लेखी देईल, असे उत्तर दिल्याने, निरीक्षकांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

बीड : येथील नगरपंचायतच्या महिला मुख्याधिकाऱ्यास अर्वाच्च भाषा वापरून धमक्या दिल्याप्रकरणी नगराध्यक्ष  पतीविरोधात पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी राजकीय दबावाला येथील पोलीस निरीक्षक बळी पडले होते, मात्र सक्षम महिला मुख्याधिकाऱ्यांनी ठोस भूमिका घेतल्याने हा दबाव हाणून पाडला. हा गुन्हा दाखल होऊन १३ दिवस झाले तरी अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. येथील पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने हे आरोपीला पाठिशी घालत आहेत. आरोपीला अटक का केली नाही, याबाबत मी एसपी साहेबांना लेखी देईल, असे उत्तर दिल्याने, निरीक्षकांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

पाटोदा येथील नगरपंचायतमध्ये १२ फेब्रुवारी रोजी सकाळी सर्वसाधारण सभेचे काम सुरु  होते. यावेळी   मुख्याधिकारी निलीमा कांबळे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, नऊ नगरसेवक आणि नगराध्यक्षांचे पती संदीप उर्फ गणेश नारायणकर हे ही  उपस्थित होते. यावेळी चौदाव्या वित्त अयोगातील कामांची चर्चा झाली. कर्मचाऱ्याने मागील खर्चासाठी मान्यतेचा मुद्दा वाचून दाखवल्यानंतर नारायणकर यांनी हातपंप दुरुस्ती बिल देण्यास विरोध केला. तसेच मुख्याधिकाऱ्यांबरोबर अरेरावी केली. तसेच अर्वाच्च भाषा वापरली. त्यानंतर कांबळे यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. मात्र येथील पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने हे राजकीय दबावाला बळी पडले आणि सकाळच्या घटनेचा गुन्हा दाखल करण्यास रात्र केली. मात्र कांबळे यांच्या ठोस भूमिकेपुढे राजकीय दबाव फिका पडला आणि गुन्हा दाखल झाला. 

दरम्यान, गुन्हा दाखल होऊन १३ दिवस झाले. महिला अधिकाऱ्याशी अरेरावी करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यासारखा गंभीर गुन्हा असतानाही पाटोदा पोलीस याकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष करीत आहेत. आरोपीला पाठिशी घालून अटक करण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे पाटोदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

वरिष्ठही संशयाच्या भोवऱ्यातपोनि सिद्धार्थ माने यांनी आरोपीला अटक का केली नाही, हे वरिष्ठांना सांगू, अशा वक्तव्यामुळे वरिष्ठ अधिकारीही संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. वरिष्ठांचे सहकार्य नसेल तर वरिष्ठांनी एवढ्या दिवस आरोपीला अटक करण्याबाबत माने यांना का विचारणा केली नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. माने मागील काही दिवसांपासून चांगलेच वादग्रस्त ठरू पहात आहेत.

आरोपी फरारचआरोपीला अटक केलेली नसून तो फरारच आहे. त्याला अटक का केली नाही, हे मी एसपी साहेबांना लेखी देईल. तपासात काय केले, हे तुम्हाला सांगू शकत नाही. मी काय ते वरिष्ठांना बोलून घेईल.- सिद्धार्थ माने, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे, पाटोदा

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसBeedबीड