शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेत पाटोदा ठरला अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 00:19 IST

जिल्ह्यात मागील दोन महिन्यात पाटोदा तालुक्यात सार्वाधिक कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया झाल्या आहेत. दुसऱ्या स्थानी बीड तर सर्वात नीचांक परळी तालुक्याचा राहिला आहे. पाटोदा तालुक्यात आणखी एक शिबीर आयोजित केले आहे. त्यामुळे आकडा आणखी वाढणार आहे.

बीड : जिल्ह्यात मागील दोन महिन्यात पाटोदा तालुक्यात सार्वाधिक कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया झाल्या आहेत. दुसऱ्या स्थानी बीड तर सर्वात नीचांक परळी तालुक्याचा राहिला आहे. पाटोदा तालुक्यात आणखी एक शिबीर आयोजित केले आहे. त्यामुळे आकडा आणखी वाढणार आहे.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मागील काही दिवसांपासून आरोग्य सेवेचा कारभार सुधारला आहे. कुटूंबकल्याण शस्त्रक्रिया करण्यासाठी पूर्वी तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी यावे लागायचे. मात्र, आता ही सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी उपलब्ध झाल्याने त्रास व वेळ वाचत आहे. या शस्त्रक्रिया स्वत: जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्यासह डॉ.अमोल मुंडे, डॉ.गाडे हे करतात. दरम्यान, पाटोदा तालुक्याने ४९ टक्के उद्दिष्ट पूर्ण करून अव्वल क्रमांक पटकावला आहे. त्यानंतर वडवणी ४८, केज ३३ यांचा क्रमांक लागतो. सर्वात कमी म्हणजेच ९ टक्के शस्त्रक्रिया परळी तालुक्यात झाल्या आहेत. डॉ. थोरात, डॉ. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाटोदा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मीकांत तांदळे, अंमळनेरचे डॉ.राजेंद्र खरमाटे, नायगावचे डॉ.मदन काकड हे शिबिराचे नियोजन करीत आहेत.दोन ठिकाणी शिबिरेपाटोदा तालुक्यात अंमळनेर व नायगाव येथे कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया केल्या जातात. डोंगरकिन्ही व वाहलीच्या महिलांना अंमळनेर येथे पाठविले जाते. डॉ.शेख, डॉ.सुमेधा भोंडवे, डॉ.कागदे यांच्याकडून ही नोंदणी केली जाते.तालुक्यात अव्वल आल्याचा आनंद आहे. अंमळनेर व नायगाव येथे शस्त्रक्रिया केल्या जातात. २२ मे रोजी आणखी एक शिबीर आयोजित केले आहे.- डॉ.लक्ष्मीकांत तांदळेतालुका आरोग्य अधिकारी, पाटोदा

टॅग्स :BeedबीडBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडHealthआरोग्य