शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

परळीत ३०० वर्षांपूर्वीचे 'झुरळे गोपीनाथ' मंदिर; झुरळांच्या रूपात मंदिरात असतो गोपिकांचा वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 15:31 IST

परळीतील 'झुरळे गोपीनाथ' मंदिराची वेगळी ओळख

- संजय खाकरेपरळी : प्रभू वैद्यनाथाच्या पावन भूमीत, जुन्या परळीतील गणेशपार भागात एक अनोखे आणि प्राचीन असे सुमारे ३०० वर्षांपूर्वीचे 'झुरळे गोपीनाथ' मंदिर आहे. हरी (भगवान विष्णू) आणि हर (प्रभू वैद्यनाथ) यांच्या हरिहर स्वरूपाचा अनुभव देणाऱ्या या ठिकाणी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतल्यानंतर झुरळे गोपीनाथांचे दर्शन घेण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. या दर्शनाशिवाय परळीची तीर्थयात्रा पूर्ण होत नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे. विशेष म्हणजे, या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास असतो, अशीही एक अनोखी आख्यायिका आहे.

शहरातील गणेशपार येथील बडवे गल्लीतील या मंदिरात प्रवेश करण्यासाठी भाविकांना दहा पायऱ्या उतरून दहा फूट खोल गाभाऱ्यात जावे लागते. या गाभाऱ्यात शालिग्राम पाषाणाची भगवान विष्णूंची चतुर्भुज मूर्ती आहे. या मूर्तीच्या हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म अशी आयुधे असून, छातीवर ऋषींच्या लाथेची खूण आहे. मूर्तीच्या पायाजवळ जय-विजय भालदार स्वरूपात विराजमान आहेत. बडवे कुटुंबातील अनिल बडवे आणि संजय बडवे हे कुटुंबीय पिढ्यानपिढ्या या मंदिराची सेवा करतात.

वर्षभर मंदिरात झुरळांचा वावर?या मंदिराच्या नावामागे एक रोचक कथा आहे. एका बडव्याच्या स्वप्नात भगवान श्रीकृष्ण आले आणि त्यांनी सांगितले की, त्यांच्या घरातील विहिरीत माझी मूर्ती आहे. त्यानंतर खोदकाम केले असता ही मूर्ती सापडली. कलियुगात आपल्यासोबत राहण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने गोपिकांना झुरळांच्या रूपात राहण्याचा वर दिला, म्हणून या देवस्थानाला 'झुरळे गोपीनाथ' असे नाव पडले. विशेष म्हणजे या मंदिरात वर्षभर झुरळांचा वावर असतो. दर्शन घेताना सहसा ही झुरळे कोणालाही स्पर्श करत नाहीत; पण ज्यांच्या अंगावर ती पडतात, त्याला भाग्यवान मानले जाते. वेदमूर्ती रवींद्र महाराज वेताळ परळीकर यांच्या मते, या मंदिराच्या दर्शनाने आयुष्य वाढते, आरोग्य सुधारते आणि मनोकामना पूर्ण होतात.

मंदिराच्या जीर्णोद्धाराची गरजपरळी शहरातील अनेक मंदिराचा मागील काही वर्षांत जीर्णोद्धार झाला; परंतु या मंदिराच्या जीर्णोद्धाराची गरज असून, मंदिराच्या सभामंडपात पावसाळ्यात पाणी गळणे व भिंती ओलसरपणा येणे त्यामुळे भाविकांची गैरयोय होत आहे.- संजय बडवे, पुजारी, झुरळे गोपीनाथ मंदिर, परळी

टॅग्स :BeedबीडSocialसामाजिक