शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

परळीत धनंजय मुंडे यांनी आघाडी टिकवली; शरद पवार गटाचे राजसाहेब देशमुख पिछाडीवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 11:02 IST

परळी विधानसभा मतदार संघ हा मुंडे यांचा गड मानल्या जातो.

- संजय खाकरे परळी : राज्याचे लक्ष लागलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटाचे नेते, महायुतीचे उमेदवार कृषी मंत्री धनंजय मुंडे हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर आहेत.  धनंजय मुंडे 8 व्या फेरी मध्ये  41 हजार 48 मतांनी आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख हे पिछाडीवर आहेत.   

पहिल्या फेरीमध्ये धनंजय मुंडे हे 6199 मते घेऊन आघाडीवर घेतली होती. तर राजेसाहेब देशमुख यांना 2771 मते मिळाली आहेत. पहिल्या फेरी अखेर 3428 मतांनी धनंजय मुंडे पुढे आहेत. त्यानंतर आघाडी कायम ठेवत आठव्या फेरीअखेर आघाडी कायम ठेवली आहे. 

परळी चे निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर यांनी सकाळी 9:30 वाजता पहिल्या फेरी अखेर धनंजय मुंडे  आघाडीवर असल्याची घोषणा केली आहे. शनिवारी  येथील शक्ती कुंज वसाहतीतील क्लब बिल्डिंगमध्ये मतमोजणीस प्रारंभ झाला. सकाळी आठ वाजता पोस्टल मतांची मतमोजणी  सुरू करण्यात आली. या मतमोजणी मध्ये धनंजय मुंडे आघाडीवर आहेत तसेच 14 टेबलवर मतमोजणी सुरुवात करण्यात आली. पहिली फेरी व दुसऱ्या फेरीमध्ये धनंजय मुंडे आघाडीवर राहिले आहेत. 

परळी विधानसभा मतदार संघ हा मुंडे यांचा गड मानल्या जातो. परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या शक्ती कुंज वसाहतीतील क्लब बिल्डींग मध्ये निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर यांच्या उपस्थितीत मतमोजणी चालू आहे. या ठिकाणी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तेजस्विनी जाधव, व्यंकटेश मुंडे, त्रिंबक कांबळे हे काम पाहत आहेत.  अंबाजोगाईच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक चेतना तिडके, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे. मतदान मोजणी स्थळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटाचे येथील नेते  वाल्मीक कराड, अजय मुंडे, बाजीराव धर्माधिकारी , सचिन मुंडे , भाजपा युवा मोर्चा बीड जिल्हा अध्यक्ष निळकंठ चाटे , प्रा पवन मुंडे  तर महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख , बहुजन विकास आघाडीचे उमेदवार डी एल उजगरे व इतर कार्यकर्ते उपस्थित आहेत. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकparli-acपरळीDhananjay Mundeधनंजय मुंडे